भिवंडीत दोन लाखाची मेफेड्रोन पावडर विक्रेत्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 07:06 PM2019-01-01T19:06:35+5:302019-01-01T19:10:17+5:30

भिवंडी : शहरातील अंजूरफाटा ते कामतघर मार्गावरील हरिधाम बिल्डींगसमोर रस्त्यावर कारमधून दोन लाखाची मेफेड्रोन अंमली पावडरची विक्री करण्यास आलेल्या ...

Two lacquer microfoam powder vendors arrested | भिवंडीत दोन लाखाची मेफेड्रोन पावडर विक्रेत्यास अटक

भिवंडीत दोन लाखाची मेफेड्रोन पावडर विक्रेत्यास अटक

Next
ठळक मुद्देभिवंडीत मेफेड्रोन पावडर विक्रेत्यास अटक२ लाख १० हजार रूपयांचे १०५ ग्राम मेफेड्रोन पावडर जप्तठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेची कारवाई

भिवंडी: शहरातील अंजूरफाटा ते कामतघर मार्गावरील हरिधाम बिल्डींगसमोर रस्त्यावर कारमधून दोन लाखाची मेफेड्रोन अंमली पावडरची विक्री करण्यास आलेल्या युवकास पोलीसांनी अटक केली आहे.
फरहान अब्दुल खालीद खरबे (३५)असे अंमली पावडर विक्रेत्याचे नांव असून तो कारमधून एमडी (मेफेड्रोन)अंमली पावडर विक्रीसाठी अंजूरफाटा-कामतघर रोड येथे आला होता. याची माहिती ठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलीसांना मिळाली होती. त्यांनी सोमवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास ग्राहकाची वाट पहात असलेल्या फरहान खरबे यास कारसह अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ २ लाख १० हजार रूपये किंमतीची १०५ ग्राम मेफेड्रोन पावडर मिळाली. मेफेड्रोन हे उत्तेजक प्रभावा व्यतिरिक्त शरिरात साईड इफेक्टस् निर्माण करतात. त्यामुळे जगातील अनेक देशांत मेफेड्रोनला प्रतिबंध करण्यात आला होता. त्यानुसार आपल्या देशांत बंदी असताना काही जण छूप्यारितीने उत्तेजक प्रभावासाठी याचा उपयोग करतात. त्यामुळे त्याची खरेदी-विक्री काळ्याबाजारातून मोठ्या रक्कमेव्दारे होत असते. अनेक तरूण या अंमली पदार्थाकडे आकर्षीत होत आहे. याचा परिणाम शहरात होऊ नये म्हणून पोलीसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी ठाणे पोलीस नियंत्रण कक्षाचे पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल जालिंदर चिंतामण यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Two lacquer microfoam powder vendors arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.