ठाणे स्टेशनातील दोन लिफ्ट सुरू
By admin | Published: December 14, 2015 12:38 AM2015-12-14T00:38:56+5:302015-12-14T00:38:56+5:30
लोकलच्या दरवाज्यात उभे राहून मागील काही दिवसात झालेल्या अपघातात चार जणांना बळी गेला आहे. लोकलवरील वाढता ताण लक्षात घेता
ठाणे : लोकलच्या दरवाज्यात उभे राहून मागील काही दिवसात झालेल्या अपघातात चार जणांना बळी गेला आहे. लोकलवरील वाढता ताण लक्षात घेता, आणि हे अपघात रोखण्यासाठी आता लोकलला इलेक्ट्रीक दरवाजे बसविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली. शनिवारी सांयकाळी ठाणे स्टेशन परिसरातील सॅटीसवर उभारलेल्या दोन लिफ्टचा आणि एलईडी दिव्यांचा शुभांरभ त्यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे आमदार संजय केळकर, महापौर संजय मोरे आदींसह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यापासून या लिफ्टचे काम पूर्ण झाले होते. परंतु तरीदेखील त्याचा शुभारंभ न झाल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार पालिकेने याची दखल घेऊन शनिवारी सांयकाळी या लिफ्टचा शुभारंभ केला. त्यांचा वापर केवळ ज्येष्ठ नागरीक आणि अंध, अपंगासाठी असणार आहे. लोकलच्या फेऱ्याही वाढविण्यात येणार असल्याची माहिती विचारे यांनी यावेळी दिली.