फायनान्स कंपनीच्या कर्मचा-याचे ठाण्यातून खंडणीसाठी अपहरण करणारे दोघे कल्याणमधून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 07:59 PM2018-02-26T19:59:19+5:302018-02-26T19:59:19+5:30

कर्ज वेळेत न दिल्याने वित्तीय कंपनीच्या कर्मचा-याचे अपहरण २१ हजारांच्या खंडणीसाठी धमकावणा-या दोघांना नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून रोकड आणि मोबाईलही हस्तगत करण्यात आला आहे.

 Two men abducting the company's employees for the ransom from Thane, Jairband from Kalyan | फायनान्स कंपनीच्या कर्मचा-याचे ठाण्यातून खंडणीसाठी अपहरण करणारे दोघे कल्याणमधून जेरबंद

कर्ज वेळेत न दिल्याच्या रागातून अपहरण

Next
ठळक मुद्देठाण्याच्या नौपाडा पोलिसांची कारवाईकर्ज वेळेत न दिल्याच्या रागातून अपहरणदोघांनाही चार दिवसांची पोलीस कोठडी

ठाणे : मुदतीमध्ये कर्ज न दिल्याचा राग आल्याने नायगाव येथील एमएम फायनान्स कंपनीतील अश्विन रघुवीर शेट्टी (२३,नालासोपारा) या कर्मचा-याचे अपहरण करून त्याला २१ हजारांच्या खंडणीसाठी धमकावणा-या मोहम्मद नंबरदार आणि तौशिक शेख या दोघांना रविवारी सकाळी नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना ठाणे न्यायालयाने २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
अश्विन हे ‘एमएम फायनान्स कन्सल्टन्सी’ या कंपनीत कर्ज प्रस्तावाचे कागदपत्र स्वीकारून ते कंपनीत जमा करण्याचे काम करतात. नंबरदार आणि तौशिक या दोघांनी अश्विन यांच्या एमएम फायनान्स कन्सल्टन्सी मध्ये ११५० रुपये देऊन कर्जासाठी नोंद केली. परंतु, त्यांनी कागदपत्रेच न दिल्याने त्यांच्या कर्जाचा प्रस्ताव अश्विन यांनी बँकेकडे पाठविलाच नव्हता. तो न गेल्यामुळे या दोघांनाही मुदतीमध्ये कर्ज मिळालेच नाही. याच गोष्टीचा राग आल्याने या दोघांनीही त्यांना बोगस ग्राहकाच्या नावाने २३ फेब्रुवारी २०१८ रोजी रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास फोन करून कर्ज प्रकरणाची कागदपत्रे ठाण्याच्या अलोक हॉटेल येथून घेऊन जाण्यासाठी बोलविले. या फोनप्रमाणे ते तिथे आल्यानंतर मात्र मोहम्मद आणि तौशिक या दोघांनीही त्यांना मारहाण करून एका कारमध्येकोंबून कल्याण येथे अपहरण करून नेले. कल्याणच्या ‘अपूर्वा आमंत्रा टाटा हाऊस’ मधील कार पार्किंगच्या जागेवर त्यांना डांबून त्यांच्या खिशातला १४ हजारांचा मोबाईल, १८०० रुपयांची रोकड जबरदस्तीने खेचून घेतली. त्यानंतर त्यांची मालकीण ममता मलिक हिलाही त्यांनी धमकी दिली. अश्विन आमच्या ताब्यात असून आम्हाला २१ हजार रुपये आणून द्या, नाही तर त्याला आम्ही तोडू, अशी खंडणीची धमकीच त्यांनी तिला दिली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अश्विन यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तौशिकसह दोघांना पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, उपनिरीक्षक अजय गंगावणे यांच्या पथकाने अटक केली.

Web Title:  Two men abducting the company's employees for the ransom from Thane, Jairband from Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.