दोन महिन्यांच्या मुलीला पालकांनी सोडले बेवारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:42 AM2021-09-03T04:42:38+5:302021-09-03T04:42:38+5:30
ठाणे : अवघ्या दोन महिन्यांच्या मुलीला तिच्या पालकांनी बेवारस सोडून पलायन केल्याची घटना सोमवारी ठाण्यात घडली. याप्रकरणी अज्ञात पालकांविरुद्ध ...
ठाणे : अवघ्या दोन महिन्यांच्या मुलीला तिच्या पालकांनी बेवारस सोडून पलायन केल्याची घटना सोमवारी ठाण्यात घडली. याप्रकरणी अज्ञात पालकांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
एक अनोळखी दोन महिन्यांची मुलगी ठाण्याच्या चरईतील सेंट जॉन दी बाप्टीस्ट हायस्कूलजवळील वैद्य इमारतीजवळ असल्याची माहिती ३० ऑगस्ट रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास नौपाडा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक योगेश लामखडे यांच्या पथकाने या मुलीच्या पालकांचा परिसरात शोध घेतला. मात्र, तिचे पालक किंवा त्यांची माहिती देणारे कोणीही आढळले नाही. अखेर या मुलीला नवी मुंबईतील नेरुळ येथील विश्वबालक केंद्र येथे देखभालीसाठी पोलिसांनी दाखल केले आहे. या मुलीची अथवा तिच्या पालकांची माहिती असलेल्यांनी नौपाडा पोलिसांशी ०२२-२५४२३०० अथवा विश्वबालक केंद्र, नेरुळ येथे ०२२-२७७२०७६५ अथवा २७७०९०४९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नौपाडा पोलिसांनी केले आहे.