ओरिसामधून महाराष्ट्रात गांजाची तस्कारी करणाऱ्या आणखी दोघे जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 08:37 PM2021-09-03T20:37:28+5:302021-09-03T20:44:27+5:30

ओरिसा येथून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाºया प्रशांत नायक (३०, रा. गंजाम, ओरिसा) आणि अरमान पटेल (३५, रा. बदलापूर, ठाणे ) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने गुरुवारी अटक केली आहे.

Two more arrested for smuggling cannabis from Orissa to Maharashtra | ओरिसामधून महाराष्ट्रात गांजाची तस्कारी करणाऱ्या आणखी दोघे जेरबंद

आठ लाख ५४ हजारांचा ३४ किलो गांजा जप्त

Next
ठळक मुद्देआठ लाख ५४ हजारांचा ३४ किलो गांजा जप्तठाणे गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ओरिसा येथून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाºया प्रशांत नायक (३०, रा. गंजाम, ओरिसा) आणि अरमान पटेल (३५, रा. बदलापूर, ठाणे ) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने गुरुवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून आठ लाख ५४ हजारांचा ३४ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे ओरिसा आणि महाराष्ट्रातील गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. याचाच फायदा बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांकडूनही घेण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. त्यामुळेच ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनीही अशा बेकायदेशीर धंद्यांवर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त सिंह यांनी सर्व पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनीही गुन्हे शाखेच्या पथकांना कारवाईचे आदेश बजावले आहेत. दरम्यान, ठाण्यात मोठया प्रमाणात गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना २ सप्टेंबर रोजी मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे घोडके यांच्यासह निरीक्षक अरुण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांच्या पथकाने घोडबंदर रोडवरील कासारवडवली भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या प्रशांत आणि अरमान या दोघांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे हे करीत आहे.
* एका आठवडयात तिसरी कारवाई-
ठाणे पोलिसांनी एका आठवडयात ही तिसरी कारवाई केली असून यापूर्वीही ठाणेनगर पोलिसांनी ओरिसातून गांजा आलेल्या चौघांना अटक करुन त्यांच्याकडून ५५ किलोचा गांजा हस्तगत केला आहे.

Web Title: Two more arrested for smuggling cannabis from Orissa to Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.