ठाण्यात कोरोनाबाधीत आणखी दोघांचा मृत्यु तर डोंबिवलीत एकाचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 07:39 PM2020-04-20T19:39:55+5:302020-04-20T19:40:18+5:30

ठाणे जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही ४२३ वर जाऊन पोहचली आहे. तर ठाण्यात कोरोनाबाधीत रुग्णांपैकी दोघांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकाडा आता चारवर गेला आहे. तर डोंबिवलीतही आज एकाचा मृत्यु झाला आहे. तर जिल्ह्यात कोरोना बाधीत मृत्यु झालेल्यांची संख्या १५ वर गेली आहे.

Two more died in Coronabadi in Thane and one died in Dombivali | ठाण्यात कोरोनाबाधीत आणखी दोघांचा मृत्यु तर डोंबिवलीत एकाचा मृत्यु

ठाण्यात कोरोनाबाधीत आणखी दोघांचा मृत्यु तर डोंबिवलीत एकाचा मृत्यु

googlenewsNext

ठाणे : ठाणे महानगर पालिकाक्षेत्रासह मीरा भार्इंदर, नवी मुंबई आणि कल्याण -डोंबिवली पालिकाक्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रु ग्णांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या चारही शहरात चिंतेचे वातावरण आहे. सोमवारी ठाण्यात दोघा कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यु झाला आहे. तर डोंबिवलीत आणखी एकाचा मृत्यु झाला आहे. सोमवारी ठाणे शहरात ०७ मीरा भार्इंदरमध्ये १२, नवी मुंबईत ०३ आणि कल्याण - डोंबिवलीत ३ आणि बदलापुरात दोन असे २८ नवीन रु ग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचा आकडा ४२३ वर पोहोचला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. दुसरीकडे नवीमुंबईतील एका खाजगी कंपनीतील ४० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातील सहा जणांचा अहवाल हा पॉझीटीव्ह आला आहे. विशेष म्हणजे यातील चार नागरीक हे ठाण्यात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे.
                   ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या ४२३ वर पोहोचली असून आता पर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात रविवारी ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत एकाच दिवशी १९ नवीन रु ग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यात सोमवारी आणखी सात नव्या रुग्णंची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधीतांची संख्या १५५ वर पोहोचली असून आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे. तसेच मीरा भार्इंदरमध्ये १२ नवीन रु ग्ण आढळून आल्याने ९४ इतकी संख्या झाली आहे. तर नवी मुंबई पालिका क्षेत्रात तीन नवे रु ग्ण आढळल्याने येथील रु ग्ग्णांची संख्या ६९ झाली आहे. तर, कल्याण डोंबिवली क्षेत्रात तीन नवीन रु ग्णांची नोंद करण्यात आल्यामुळे तेथील रु ग्णांचा आकडा ७८ वर पोहोचला आहे. तर डोंबिवलीत सोमवारी कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यु झाला आहे. विशेष म्हणजे सोमवारी या चार शहरांव्यतिरिक्त बदलापूरमध्ये दोन जणांना कोरोनाची लागण झाली. तर अंबरनाथ, ठाणे ग्रामीण आणि भिवंडी या शहरांमध्ये नव्या रु ग्णाची नोंद करण्यात आली नाही.
ठाणे शहरातील करोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. रविवारी ठाण्यात १९ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर सोमवारी ठाण्यात नवीन ७ रु ग्ण सापडले सापडले आहेत. त्यामुळे ठाणे शहरातील रु ग्णांचा एकूण आकडा १५५ झाला आहे. दरम्यान सोमवारी टेकडी बंगला परिसरातील ६७ वर्षीय रुग्णाचा कोरोनाने मृत्यु झाला. त्यामुळे ठाण्यातील मृत्यु झालेल्या रुग्णांची संख्या ४ झाली आहे. दरम्यान दुसरीकडे लोकमान्य नगर भागातही एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाला आहे. त्याला मधुमेह झाल्याने कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर १८ एप्रिल रोजी त्याचा मृत्यु झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला. परंतु त्याचा मृत्यु हा कोरोनामुळे झाल्याचा अहवाल आता रविवारी प्राप्त झाला आहे. या संदर्भात पालिकेशी संपर्क साधला असता उपायुक्त संदीप माळवी यांनी सदर रुग्ण हा मधुमेह उपचारासांठी कळवा रुग्णालयात दाखल झाल्याचे सांगितले.त्याच्यावर उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यु झाला. परंतु रविवारी त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाला असून तो पॉझीटीव्ह आला आहे. मात्र त्याने या संदर्भात कोणत्याही स्वरुपाची माहिती रुग्णाने दिली नव्हती. सदर रुग्ण हा केवळ मधुमेहासाठी रुग्णालयात दाखल झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे सदर मृत व्यक्तीच्या अंतदर्शन अंत्यसंस्कारासाठी आणि ५० ते ६० नागरीक सहभागी झाले होते. दरम्यान आता अशा व्यक्तींचा शोध घेऊन येथील ५१ नागरीकांना घोडबंदर येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान आता लोकमान्य नगर आणि शास्त्री नगर या भागातील अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात आल्या असल्याची माहिती स्थानिक नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी दिली. संबधीत व्यक्ती ही कोणाकोणाच्या संपर्कात आली होती, याचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी सोमवारी महापालिका अधिकाऱ्यांची एक बैठकही घेण्यात आली होती. त्यानुसार रविवारी पर्यंत या भागातील २२ पैकी ११ मेडीकल दुकाने उघडी राहणार असून दुधासाठी सकाळी दोन तासांचा कालावधी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान डोंबिवलीतही सोमवारी एकाचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांची संख्या १५ वर गेली आहे.
 

Web Title: Two more died in Coronabadi in Thane and one died in Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.