धक्कादायक! ठाण्यात ओमायक्रॉनचे आणखी दोन रुग्ण; घरी सोडल्यानंतर आला रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 10:20 PM2021-12-26T22:20:25+5:302021-12-26T22:21:14+5:30
लोकमान्यनगर परिसरात राहणारे कुटुंब ११ डिसेंबर रोजी नायजेरियन येथून आले होते. त्यावेळी केलेल्या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला होता. तसेच ठाणे महापालिकेने सात दिवसांनी केलेल्या टेस्टमध्ये ४० वर्षीय महिलेसह तिचा ९ वर्षीय मुलगा असे दोघे पॉझटिव्ह आढळून आले.
ठाणे : पश्चिम आफ्रिकेतील घाणा येथून ठाण्यात आलेल्या एका ४० वर्षीय नागरिकाला ओमायक्रॉनची लागण झाल्याची घटना ताजी असताना, रविवारी आणखी दोघांना ओमायक्रॉनची लागण झाल्याची बाब पुढे आली आहे. त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. त्यांना ठाण्यातील बेथनी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तिथून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर ठाणे शहरातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता तीनवर पोहोचली आहे.
लोकमान्यनगर परिसरात राहणारे कुटुंब ११ डिसेंबर रोजी नायजेरियन येथून आले होते. त्यावेळी केलेल्या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला होता. तसेच ठाणे महापालिकेने सात दिवसांनी केलेल्या टेस्टमध्ये ४० वर्षीय महिलेसह तिचा ९ वर्षीय मुलगा असे दोघे पॉझटिव्ह आढळून आले. त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. त्यांना उपचारार्थ बेथनी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे २६ डिसेंबरला स्पष्ट झाले. मात्र तोपर्यंत रुग्णालयाने त्यांना घरी सोडले होते.
तसेच संबंधित महिलेच्या पतीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. या वाढत्या रुग्णांमुळे ठाणेकर नागरिकांनी मास्क वापरावा तसेच कोरोना संबंधित नियमांचे पालन करावे, असे आवाहनही ठामपाने केले आहे.