स्वाईन फ्लू चे आणखी दोन बळी
By Admin | Published: April 13, 2017 07:19 PM2017-04-13T19:19:04+5:302017-04-13T19:19:04+5:30
अकोला :स्वाईन फ्लू या घातक आजाराची लागण झालेल्या दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान गुरुवारी एका खासगी इस्पितळात मृत्यू झाला.
मृतकांची संख्या ३ वर : पॉझिटीव्ह व संशयीत रुग्णांवर उपचार सुरु
अकोला : राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाईन फ्लू या घातक आजाराने अकोल्यातही पाय पसरले असून, या आजाराची लागण झालेल्या दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान गुरुवारी एका खासगी इस्पितळात मृत्यू झाला. यापूर्वी ५ मार्च रोजी स्वाईन फ्लू मुळे एकाचा मृत्यू झाला होता. यात आणखी दोघांची भर पडल्याने स्वाईन फ्लू च्या बळींची एकूण संख्या ३ वर पोहचली आहे. शहरात या आजाराचे सहा पॉझिटीव्ह व ४ संशयीत रुग्ण असून, त्यांच्यावर शहरातील खासगी व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
एच १ एन १ या विषाणूंपासून होणारा स्वाईन फ्लू हा अत्यंत संसर्गजन्य आजार असून, त्याचा प्रसार हवेच्या माध्यमातून एका रुग्णापासून दुसऱ्यापर्यंत होतो. वराहांमध्ये हा विषाणू आढळून येत असल्यामुळे वराहांच्या संपर्कात राहिल्याने हा आजार होण्याची शक्यता बळावते. स्वाईनची लागन झालेला अमरावती येथील वडाळी नाका भागातील रुग्ण मार्च महिन्यात येथील एका मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल झाला होता. तेव्हापासून स्वाईनच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत शहरात स्वाईन फ्लूचे ९ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी बुधवार, ५ एप्रिल रोजी न्यू तापडीया नगर भागातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर गुरुवार, १३ एप्रिल रोजी एका मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला.