उल्हासनगर महापालिकेच्या दोन मुकादमाला लाच घेतांना अटक
By सदानंद नाईक | Published: January 5, 2023 06:17 PM2023-01-05T18:17:38+5:302023-01-05T18:19:46+5:30
उल्हासनगरात अवैध बांधकामाचा सुळसुळाट झाला असून बांधकाम परवान्यांचे खोटे नामफलक बांधकामा समोर लावून बिनधास्त अवैध बांधकामे होत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
उल्हासनगर : महापालिका प्रभाग समिती क्रं-३ च्या कार्यालयातील दोन मुकादमांना बुधवारी सायंकाळी बांधकामाला अभय देण्यासाठी ४ हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगरात अवैध बांधकामाचा सुळसुळाट झाला असून बांधकाम परवान्यांचे खोटे नामफलक बांधकामा समोर लावून बिनधास्त अवैध बांधकामे होत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. प्रभाग समिती कार्यालयाने त्यांच्या अंतर्गत सुरू असलेल्या बांधकामाची चौकाशी केल्यास मोठा घोळ उघड होणार आहे. प्रभाग समिती क्रं-३ कार्यालया अंतर्गत एका घराची दुरुस्ती सुरू होती. घर दुरुस्तीची कामे सुरू ठेवण्यासाठी कार्यालयातील मुकादम बाजीराव बनकर व वसंत फुलोरे यांनी घरमालकाकडे ५ हजाराची लाचेची मागणी केली. घरमालकाने याबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताडणी केल्यावर बुधवारी सायंकाळी प्रभाग समिती क्रं-३ कार्यालयात दोन्ही मुकादमाना ४ हजाराची लाच घेताना रंगेहात अटक केली.
याप्रकरणी विट्ठलवाडी पोलीस ठाण्यात बाजीराव बनकर व वसंत फुलोरे यांच्या विरोधात गुन्हे दाखल केला. अधिक तपास स्थानिक पोलीस करीत