बदलापूरमध्ये कोरोनाचे दोन नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 02:32 AM2020-04-30T02:32:16+5:302020-04-30T02:32:23+5:30
बदलापूर पूर्व भागातील एका वैद्यकीय कर्मचाऱ्याचा तर बदलापूर पश्चिम भागातील एका प्लंबरचा समावेश आहे. हे दोघेही मुंबईत कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली.
बदलापूर : बदलापूरमध्ये मंगळवारी रात्री दोन नवे रु ग्ण आढळले. यामध्ये बदलापूर पूर्व भागातील एका वैद्यकीय कर्मचाऱ्याचा तर बदलापूर पश्चिम भागातील एका प्लंबरचा समावेश आहे. हे दोघेही मुंबईत कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली.
बदलापूर पूर्व भागातील कात्रप परिसरात राहणारी वैद्यकीय कर्मचारी नायर रुग्णालयात कामाला असून त्यांना तेथेच दाखल केले आहे. तेथे काम करताना कोरोनाची लागण झाली. रुग्णालयातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्या २४ मार्चपासून रुग्णालयाच्या वसाहतीत राहत होत्या. मात्र २२ एप्रिल रोजी त्या बदलापूरमध्ये आपल्या घरी येऊन पुन्हा मुंबईला गेल्या. त्यामुळे त्यांचे पती व सासू यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली असून अहवाल आलेला नाही.
दुसरा रुग्ण हा बदलापूर पश्चिम भागातील आहे. रमेशवाडी भागात राहणारी ही व्यक्ती ५७ वर्षांची असन ते मुलुंड येथे टाटा कॉलनीत प्लंबर आहेत. ते ९ एप्रिलपर्यंतच कामाला गेले होते. त्यांना खोकल्याचा त्रास जाणवल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. सध्या ते क्वारंटाईन केंद्रात उपचार घेत आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन केल्याचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी सांगितले.
>भिवंडीत आणखी एक रुग्ण : कामतघर येथील ४८ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले आहे. तिच्या घरातील चौघांनाही क्वारंटाइन केले आहे. ही महिला मुंबईतील आॅर्थर रोड येथे एक महिन्यासाठी माहेरी गेली होती. २० एप्रिलला ती भिवंडीत सासरी आली, तेव्हा पालिकेने क्वारंटाइन केंद्रात दाखल केले. या महिलेची मोजणी मुंबईच्या यादीतच होणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत धुळे यांनी दिली. त्यामुळे भिवंडीतील रु ग्णांची संख्या १२ एवढी आहे.