स्वाइन फ्लूने दोन जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:11 AM2019-02-27T00:11:45+5:302019-02-27T00:11:55+5:30

४८ रुग्णांवर सुरु आहेत उपचार : ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीतील परिस्थिती

Two people have died due to swine flu | स्वाइन फ्लूने दोन जणांचा मृत्यू

स्वाइन फ्लूने दोन जणांचा मृत्यू

googlenewsNext

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे व नवी मुंबई महापालिकेपाठोपाठ कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. १ जानेवारी ते २१ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत स्वाईन फ्लू बाधितांची संख्या ४८ वर पोहोचली आहे. तर, ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत प्रत्येकी एक अशा दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा रु ग्णालय प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.


ठाणे महापालिका क्षेत्रात जानेवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत ५७१ रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये स्वाईन फ्लू बाधित रु ग्णांची संख्या ३६ वर गेली आहे. यातील ३० रु ग्ण हे ठाण्याचे रहिवासी असून उर्वरीत सहा जणांना उपचारांसाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातून ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यात एका रु ग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याच कालावधीत नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील १४ रु ग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये स्वाईन फ्लू बाधित रु ग्णांची संख्या ८ वर गेली आहे. यातील ४ रु ग्ण हे ठाण्याचे रहिवासी असून उर्वरीत रु ग्ण हे खोपोली आणि खारघर भागातून उपचारासाठी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दाखल झाले आहेत. त्या पाठोपाठ कल्याण -डोंबिवली पालिकेच्या हद्दीत ७४ संशयित रु ग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी ४ रुग्णांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे.

एक रु ग्ण दगावला असून उर्वरीत दोघांवर योग्य उपचार करु न त्यांना सोडून देण्यात आले आहे. एक जण रु ग्णालयात दाखल असून त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रु ग्णालय, नवी मुंबई महापालिकेने वाशी येथील रु ग्णालयात तसेच जिल्हा सामान्य रु ग्णालयात आणि आता, केडीएमसीने त्यांच्या रुग्णालयात स्वाईन फ्लूचे विशेष वॉर्ड सज्ज केले आहेत.

ग्रामीण भागातही आढळले रुग्ण
ठाणे शहरात स्वाईन फ्लूचे रु ग्ण आढळले असून, त्यातील काही रु ग्ण हे ग्रामीण भागातील आहे. तसेच स्वाईन फ्ल्यूची लक्षणे आढळून आल्यास जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन तात्काळ उपचार घ्यावा. तसेच पालिका रुग्णालयांमध्ये जाऊन मुबलक प्रमाणात उपलब्ध टॅमी फ्लूची औषधे घ्यावी.
- डॉ. आर. टी. केंद्रे, आरोग्य
अधिकारी, ठाणे महापालिका.

नागरीकांनी दक्षता घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, तसेच सर्दी, खोकला, ताप आणि स्वाईन फ्लूसारखी लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून उपचार करुन घ्यावा.
- डॉ. आर.डी. लवंगरे,
आरोग्य अधिकारी,
कल्याण - डोंबिवली महापालिका

Web Title: Two people have died due to swine flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.