स्लॅब कोसळून दोघे जखमी

By admin | Published: February 23, 2017 05:51 AM2017-02-23T05:51:50+5:302017-02-23T05:51:50+5:30

मीरा रोडच्या नयानगरमधील एका इमारतीमधील सहाव्या मजल्यावरील सदनिकेचा स्लॅब

Two slab collapses | स्लॅब कोसळून दोघे जखमी

स्लॅब कोसळून दोघे जखमी

Next

मीरा रोड : मीरा रोडच्या नयानगरमधील एका इमारतीमधील सहाव्या मजल्यावरील सदनिकेचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी नऊ महिन्यांच्या बाळासह एकूण सात जणांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेनंतर रहिवाशांना इमारत रिकामी करण्यास सांगितले.
लोधा मार्गावर सीतास्मृती नावाची सहा मजली इमारत आहे. या इमारतीच्या बी विंगमधील सहाव्या मजल्यावर इमरान अली शेख (३५) हे कुटुंबासह राहतात. बुधवारी दुपारी इमरान हे पत्नी जहारासह हॉलमध्ये होते. तर भाऊ शमशाद, त्याची पत्नी आयशा तसेच लहान मुले कामरान, आयशा व ९ महिन्यांचा आहिल हे बेडरूममध्ये होते. पावणेतीनच्या सुमारास हॉलचे फ्लोअरिंग कोसळून पाचव्या मजल्यावर पडले. इमरान व जहारा स्लॅबसह खाली कोसळून जखमी झाले. सुदैवाने मुले बेडरूममध्ये असल्याने बचावली.
या घटनेने शेजारी व परिसरातील नागरिक धावून आले. काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मदतकार्यास सुरुवात केली. इमरान व जहारा यांना रुग्णालयात दाखल केले. सहाव्या मजल्यावर अडकून पडलेल्या शमशाद अली शेख (३८), आयशा शमशाद शेख (३०), कामरान (वय ८), आयशा (वय २) व आहिल, तर पाचव्या मजल्यावरील सीताराबानू व शहाबानू अशा सात जणांना जवानांनी सुखरूप बाहेर काढले. उपायुक्त दीपक पुजारी यांनी घटनास्थळाला भेट दिली. आम्ही रहिवाशांना इमारत रिकामी करायला सांगितले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Two slab collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.