मुंब्य्रात दोन हजारांच्या ७८८ बनावट नोटा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 04:56 AM2019-03-31T04:56:50+5:302019-03-31T04:57:36+5:30

तिघांना अटक : मुंब्रा पोलिसांची कारवाई

Two thousand 788 fake currency seized in Mumbra | मुंब्य्रात दोन हजारांच्या ७८८ बनावट नोटा जप्त

मुंब्य्रात दोन हजारांच्या ७८८ बनावट नोटा जप्त

Next

ठाणे/मुंब्रा : उत्तर प्रदेशातून मुंब्य्रात आणलेल्या दोन हजारांच्या ७८८ बनावट नोटा मुंब्रा पोलिसांनी शुक्रवारी पहाटे जप्त केल्या. याप्रकरणी जौनकुमार छुन्नुलाल (४१), मोहम्मद दिलशाद शराजुद्दीन (२६) आणि जावेद अहमद शरीफ अहमद अन्सारी (३०) यांना अटक केली. जप्त केलेल्या नोटांचे एकूण मूल्य पावणेसोळा लाख रु पये आहे. आरोपींना ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती ठाणे परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी शनिवारी मुंब्य्रात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मुंब्य्रातील किस्मत कॉलनी परिसरात काही जण बनावट नोटांसह येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक ए.टी. बडे यांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाने त्या परिसरात संशयास्पद फिरताना जौन, मोहम्मद आणि जावेद यांना ताब्यात घेतले. जौन आणि मोहम्मद उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील असून जावेद मुंब्य्रातील आहे. चौकशीत छुन्नुलाल याच्या बॅगेमध्ये कपड्यात बांधलेल्या दोन हजारच्या एकूण १५ लाख ७६ हजार रु पये मूल्याच्या ७८८ बनावट नोटा आढळल्या.
याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात भादंवि ४८९ (क), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर करत आहेत.

निवडणुकीच्या तोंडावर नोटा सापडल्याने खळबळ
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या बनावट नोटा सापडल्याने खळबळ उडाली आहे. या नोटा पश्चिम बंगाल येथून उत्तर प्रदेशात नेऊ न तेथून त्या महाराष्टÑात चलनात आणण्यासाठी आले असल्याची माहिती मिळत असून निवडणुकीदरम्यान बनावट नोटा चलनात आणणारे एखादे रॅकेट सक्रिय आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Two thousand 788 fake currency seized in Mumbra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.