रेशनकार्डवर पत्ता बदली करण्यासाठी दोन हजारांची लाच घेणारा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 09:58 PM2021-03-18T21:58:34+5:302021-03-18T21:59:36+5:30

रेशनकार्डवरील पत्ता बदली करण्यासाठी तसेच मुलाचे नाव लावण्यासाठी संबंधित तक्रारदाराकडून गुंड हे अडीच हजारांच्या लाचेची मागणी करीत होते. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी ठाणे एसीबीकडे तक्रार केली होती. याच तक्रारीची ठाणे एसीबीने १० मार्च २०२१ रोजी पंचांच्या मदतीने पडताळणी केली.

Two thousand bribe taker arrested for changing address on ration card | रेशनकार्डवर पत्ता बदली करण्यासाठी दोन हजारांची लाच घेणारा अटकेत

ठाणे एसीबीची कारवाई

Next
ठळक मुद्दे ठाणे एसीबीची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: रेशनकार्डवर पत्ता बदली करण्यासाठी दोन हजारांची लाच घेणाऱ्या अजयकुमार गुंड (४२) याला ठाणेलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक करण्यात आली. याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेशनकार्डवरील पत्ता बदली करण्यासाठी तसेच मुलाचे नाव लावण्यासाठी संबंधित तक्रारदाराकडून गुंड हे अडीच हजारांच्या लाचेची मागणी करीत होते. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी ठाणे एसीबीकडे तक्रार केली होती. याच तक्रारीची ठाणे एसीबीने १० मार्च २०२१ रोजी पंचांच्या मदतीने पडताळणी केली. तेंव्हा गुंड यांनी तक्र ारदार यांना दोन हजारांचा पहिला हाप्ता मागितला. काम पूर्ण झाल्यानंतर पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे पडताळणीमध्ये स्पष्ट झाले. त्यानंतर सापळा रचून तक्र ारदार यांना दोन हजारांच्या लाचेच्या रकमेसह पाठविण्यात आले. तेंव्हा ही दोन हजारांची रक्कम स्वीकारतांना त्यांना एसीबीने रंगेहाथ अटक केली.

Web Title: Two thousand bribe taker arrested for changing address on ration card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.