रील बनविताना दाेघांना रेल्वेने उडविले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 07:10 AM2023-05-16T07:10:18+5:302023-05-16T07:11:02+5:30
अपघाताची माहिती मिळताच डोंबिवली लोहमार्ग ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
डोंबिवली : रेल्वे रुळांमध्ये मोबाइलवर रील बनवताना साेमवारी संध्याकाळी दाेन युवकांना ठाकुर्ली रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेने उडविले. यात दाेघांचाही मृत्यू झाला असून त्यांची नावे समजू शकलेली नाहीत.
अपघाताची माहिती मिळताच डोंबिवली लोहमार्ग ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ज्यापद्धतीने मोबाइल आणि हे युवक पडले होते, त्यावरून मोबाइलवर रील बनवण्याच्या नादात हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज त्यांनी वर्तवला आहे. या दाेघांना रुग्णालयात नेले असता तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
तपासादरम्यान रात्री ९:३० च्या सुमारास एका युवकाच्या मोबाइल सिमकार्डमधील नंबरच्या आधारे एकाच्या नातेवाइकांना संपर्क केला असून रात्री उशिरापर्यंत ते पोलिस ठाण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतरच या युवकांचे नाव, पत्ता मिळू शकणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.