ठाण्यात लवकरच दुचाकी रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:56 AM2018-02-22T00:56:36+5:302018-02-22T00:56:36+5:30

मुंबईप्रमाणेच ठाणे पालिकेनेही बाईक अ‍ॅम्बुलन्स सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ४२ लाख खर्चून ३० दुचाकी घेतल्या जाणार आहेत

Two-wheeler ambulance soon in Thane | ठाण्यात लवकरच दुचाकी रुग्णवाहिका

ठाण्यात लवकरच दुचाकी रुग्णवाहिका

Next

ठाणे : मुंबईप्रमाणेच ठाणे पालिकेनेही बाईक अ‍ॅम्बुलन्स सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ४२ लाख खर्चून ३० दुचाकी घेतल्या जाणार आहेत. ह्रदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी प्रशासनाने डिफिब्रिलेटर यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला असतानाच तत्काळ उपचाराअभावी प्राण गमावावे लागणाºया रुग्णांचे या दुचाकी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून वाचविणे शक्य होईल. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत येणार आहे.
ठाणे शहर वेगाने वाढले आहे. रुंदीकरण झाले. काही रस्ते आजही अरुंद राहिलेले आहेत. अशा ठिकाणी रुग्णवाहिका जाणे शक्य होत नाही. आणि गेलीच तरी रुग्णालयापर्यंत पोहचतांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे रुग्णाला वेळीच उपचार मिळतील अथवा नाही, याबाबतची सांगणे कठिण आहे. अशा वेळी तेथील रुग्णाला तत्काळ उपचार कसे मिळतील यासाठीचा प्रयत्न म्हणून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दुचाकी ररूग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महापालिका आरोग्य विभागाच्या ताफ्यात ३० दुचाकी रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात येणार असून त्यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला आहे. रु ग्णवाहीकेसाठी खरेदी करण्यात येणाºया दुचाकींवर विंडशील, सायरन, वैद्यकीय साहित्य ठेवण्यासाठी बॉक्स आणि इतर साहित्य बसविण्यात येणार आहेत. या दुचाकींच्या माध्यमातून शहरातील रु ग्णांपर्यंत तत्काळ पोहचून त्यांना आरोग्य सेवा पुरविणे शक्य होणार आहे.

Web Title: Two-wheeler ambulance soon in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.