सेवाग्राम एक्स्प्रेसच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 06:08 AM2018-06-19T06:08:02+5:302018-06-19T06:08:02+5:30

रेल्वे फाटक बंद असतानाही त्याच्या खालून दुचाकी नेणाऱ्या दोन नाका कामगारांचा सेवाग्राम एक्स्प्रेसच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता दिवा स्थानकात घडली.

Two wheeler killers killed in Sevagram Express | सेवाग्राम एक्स्प्रेसच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

सेवाग्राम एक्स्प्रेसच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

Next

डोंबिवली : रेल्वे फाटक बंद असतानाही त्याच्या खालून दुचाकी नेणाऱ्या दोन नाका कामगारांचा सेवाग्राम एक्स्प्रेसच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता दिवा स्थानकात घडली. अंग्रेज चौधरी आणि रामचरण चौधरी (रा. बस्ती, उत्तर प्रदेश) अशी त्यांची नावे असल्याची प्राथमिक माहिती तपासाधिका-यांनी दिली.
तपासाधिकारी पोलीस निरीक्षक एस. व्ही. ढाकणे यांनी सांगितले की, अंग्रेज आणि रामचरण हे दिवा गावातील एका घरात फरशी बसविण्यासाठी सोमवारी सकाळी आले होते. त्या वेळी फाटक बंद असतानाही ते पश्चिमेहून पूर्वेला रेल्वे फाटकातून दुचाकी नेत होते. मात्र, मुंबईकडे जाणाºया सेवाग्राम एक्स्प्रेसच्या वेगाचा अंदाज त्यांना आला नाही. त्यामुळे या एक्स्प्रेसची त्यांच्या दुचाकीला धडक बसून ते जखमी झाले. या दोघांना गावातील जीवनदीप रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.’
अपघात घडल्यानंतर स्थानकात आरडाओरडा झाल्याने काही वेळ सेवाग्राम एक्स्प्रेस थांबली होती. यावेळी बघ्यांनी गर्दी केल्याने काही वेळ मदतकार्यात अडथळा आला. परंतु, रेल्वे पोलिसांनी त्यांना पांगवले.
दिव्यातील म्हात्रे नामक व्यक्तीकडे फरशी बसविण्याचे काम करण्यासाठी अंग्रेज आणि रामचरण आले होते, पण ते कुठले रहिवासी होते, दिव्यात कधीपासून आले होते, काय काम करत होते, आदी तपशील मिळविण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. अपघातग्रस्त दुचाकी ही कपिल माळी यांच्या नावे असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे, परंतु माळी यांनी मोबाइल फोन न उचलल्याने दुचाकी त्या दोघांकडे कशी आली, याची माहिती मिळविण्यात अडथळे आल्याचे ढाकणे यांनी सांगितले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, मध्य रेल्वेच्या उपनगरीय यात्री उपभोक्ता समितीचे सदस्य अ‍ॅड. आदेश भगत यांनी घटनास्थळी पाहणी केली. ते म्हणाले की, ‘गेटमनने दुचाकीस्वारांना फाटक बंद असल्याचे सांगितले होते, परंतु त्यांनी त्याकडे कानाडोळा केला. ते पुढे गेल्याने अपघात झाला.’
>...तरीही रूळ ओलांडणे सुरूच
दिवा स्थानकातील या अपघातानंतर पूर्वेला रेल्वे फाटकाजवळ रेल्वे सुरक्षा बलाचे दोन पोलीस तैनात करण्यात आले. मात्र, तरीही प्रवासी जीव धोक्यात घालून रूळ ओलांडून प्रवास करत होते. त्यामुळे पोलीस हतबल असल्याचे दिसून आले.
फाटकात कायमस्वरूपी पोलीस तैनात करावेत, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली असतानाही सुरक्षा यंत्रणा मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जिवास धोका आहे.

Web Title: Two wheeler killers killed in Sevagram Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.