आर्थिक फसवणुक करणाऱ्या मुंबई पुण्याची दुकली गजाआड ; १६ जणांची फसवणूक
By अजित मांडके | Published: December 6, 2023 04:52 PM2023-12-06T16:52:26+5:302023-12-06T16:55:23+5:30
"ट्रॅव्हलींग हॉस्पीटॅलीटी सर्व्हिसेसच्या नावाखाली नागरिकांना देश- विदेशात फिरण्याची संधी मिळेल असे आश्वासन देऊन त्यांची आर्थिक फसवणुक ठाण्यात धक्कादायक प्रकार उघड.
अजित मांडके, ठाणे : "ट्रॅव्हलींग हॉस्पीटॅलीटी सर्व्हिसेसच्या नावाखाली नागरिकांना देश- विदेशात फिरण्याची संधी मिळेल असे आश्वासन देऊन त्यांची आर्थिक फसवणुक करणाऱ्या अख्तर हुसेन शेख (६३) आणि शैलेंद्र दिपक काळे (४६) या मुंबई-पुण्यातील दुकलीला श्रीनगर पोलिसांनी अटक केली. ते दोघे वागळे इस्टेट येथील " कार्लटन काऊन सर्व्हिसेस प्रा. लिमी. कंपनीचे डायरेक्टर आहेत. त्यांनी या गुन्हयात तक्रारदार व इतर १५ साक्षीदारांची १२ लाख १९ हजारांची फसवणुक करून ती रक्कम परत न देता त्या रक्कमेचा अपहार केल्याची माहिती तपासात निष्पन्न झाले. अशी माहिती पोलिसांनी दिली.
अटकेतील दुकलीने कंपनीचे स्थापने बाबत खोटी माहिती देवून कंपनी मार्फत ८९ हजारांचे पॅकेजमध्ये डिसेंबर महिना वगळुन ०३ वर्षांमध्ये भारतात कुठेही एकुण २१ दिवस हॉटेलमधील वास्तव्य व एकावेळचे जेवण मोफत, प्रत्येक दिवसाचे फक्त ०१ हजार रूपये भरावे लागतील तसेच १ लाख ३५ हजार रुपयांमध्ये वरीलप्रमाणेच स्कीम सांगुन यामध्ये भारतात व भारताबाहेर (युरोप वगळून) एकूण ३५ दिवस जावु शकता तसेच भारताबाहेर जाताना विमानाचे तिकीट कंपनीतर्फे असेल असे देश विदेशात फिरण्याची संथी मिळेल अशी ठाण्यातील विविध शॉपिंग मॉल मध्ये जाहिरात करुन त्याव्दारे लोकांना आकर्षित केले. त्यांनी कंपनीची जाहिरात आवडल्यानंतर तसेच त्यांनी फॉर्म भरल्यानंतर त्यांना कंपनीच्या पत्यावर बोलावून त्यांचेकडून रोख रक्कम स्विकारली जात होती. असे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच तक्रारदारांनी गुगलवर कंपनीची माहिती तपासली असता त्यामध्ये कंपनीचे डायरेक्टर व कंपनीची स्थापना यामध्ये तफावत आढळून आल्याने त्यांनी कंपनीकडे भरलेल्या १ लाख ३५ हजारांची मागणी सुरु केली. तर कंपनीने तक्रारदार यांचे पैसे परत न करता कंपनीचे कार्यालय बंद करून ते सर्व साहित्यानिशी पळून गेले.
याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात २६ नोव्हेंबर २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्यावर पोलिसांनी घाटकोपर येथील शेख याला ४ डिसेंबर तर पुणे येथील काळे ५ डिसेंबरला अटक केली. त्या दोघांना येत्या ०८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कामगिरी श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस हवालदार चंद्रकांत संकपाळ, सुनिल माने, वनपाल व्हणमाने, पोलीस शिपाई राकेश पवार यांनी पार पाडली आहे.