ठाण्यात स्वाईन फ्लुने दोन दिवसात दोन महिलांचा मृत्यू; २० जणांना लागण
By अजित मांडके | Published: July 25, 2022 03:41 PM2022-07-25T15:41:04+5:302022-07-25T15:41:54+5:30
मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातही स्वाईन फ्लूने दस्तक दिल्याचे दिसून आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातही स्वाईन फ्लूने दस्तक दिल्याचे दिसून आले आहे. मागील काही दिवसात ठाणे शहरात या आजाराचे २० रुग्ण आढळून आले आहेत. तर दोन महिलांचा मृत्यु या आजाराने झाला असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. या दोनही महिला कोपरी भागातील असल्याचे सांगण्यात आले असून त्यानुसार आता या भागाचा सव्र्हे करण्याचे काम आरोग्य विभागाने सुरु केले आहे. त्यानुसार ६०० घरांचे सव्र्हेक्षण करण्यात आले असून त्यात अद्याप कोणाला लक्षणो आढळलेली नसल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोनाची साथ काही प्रमाणात आटोक्यात येत असतांना आता ठाण्यात स्वाईन फ्लुने डोके वर काढल्याचे दिसून आले आहे. त्यात स्वाईन फ्लूने दोघांचा बळी घेतला आहे. मृत झालेल्यांमध्ये दोन्ही महिलांचा समावेश असून एकीचे वय ७१ दुसऱ्या महिलेचे वय ५१ वर्षे असल्याचे सांगण्यात आले आहेर्. आहे. यातील पहिली महिला रुग्ण ही १४ जुलै रोजी उपचारांसाठी दाखल झाली. त्यानंतर १९ जुलैला तिचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तर दुसरी महिला ही १४ जुलैलाच खाजगी रुग्णालयात दाखल झाली होती. तिचा मृत्यु १८ जुलै रोजी झाला असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. तर जुलै महिन्यात २० स्वाईन फ्लूचे रु ग्ण आढळून आले असून यातील १५ जणांवर यशस्वी उपचार होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर ५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
याशिवाय डेंग्यु आणि मलेरियाचे रु ग्ण देखील वाढले असून ठाण्यात सध्या डेंग्यूचे ८ तर मलेरियाचे १४ रु ग्ण अढळले आहेत. मात्न या आजाराने एकाचाही मृत्यू झालेला नसल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पालिका प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत ६०० लोकांच्या घरात जाऊन तापाचे आणि स्वाईन फ्लू ची लक्षणे आहेत की नाही याची तपासणी केली आहे. यामध्ये अजूनही कोणाला लक्षणो अढळली नसली तरी प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे.