घरगुती गॅस सिलेंडरच्या भडक्याने दोन महिला जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 08:17 PM2021-03-26T20:17:12+5:302021-03-26T20:18:03+5:30
Cylinder Blast : उपचारासाठी स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
मुंब्राः रबरी नळीमधील गॅस लिकेजमुळे मुंब्य्राजवळील शीळफाटा परिसरातील एका इमारतीमधील स्वयंपाक घरात लागलेल्या आगीत एका वृद्धेसह दोन महिला जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
शीळफाटा येथील खान कम्पाउंड जवळील एमएमआरडीच्या इमारतीमधील २३ व्या मजल्यावरील रूम नंबर २३०६ मध्ये शुक्रवारी दुपारी १.४० वाजण्याच्या सुमारास रबरी नळीमधून गॅसगळती होत होती. याबाबत अनभिज्ञ असलेल्या नूरजहाँ बेंद्रेकर (७०) आणि फयाद इरफान बेंद्रेकर (४५) या दोघी जेवण करताना अचानक भडका उडून आग लागली. या आगीत नूरजहाँ या ५० टक्के भाजल्या असून त्यांचा हात आणि पाठिमागील बाजूस दुखापत झाली आहे. तर फयाद या १८ टक्के भाजल्या असल्याची माहिती माहिती ठामपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख अधिकारी संतोष कदम आणि शीळ अग्निशमनकेंद्राचे स्थानक प्रमुख पी.डी.पाटील यांनी लोकमतला दिली.