कळव्याच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिला दलालांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 09:57 PM2019-08-29T21:57:25+5:302019-08-29T22:07:05+5:30
आधी गि-हाईक हेरल्यानंतर त्यांना फोनवरुनच शरीरविक्रयासाठी गरजू महिला किंवा तरुणींना पाठवून त्यांच्याकडून सेक्स कळव्यातील उच्चभ्रू वस्तीमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिला दलालांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने बुधवारी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कळव्याच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये सेक्स रॅकेट चालविणा-या दोन महिला दलालांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने बुधवारी रात्री अटक केली. त्यांच्या तावडीतून एका पीडित महिलेचीही सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कळव्यातील मनिषानगर भागात ग्राहकांना हेरुन फोनवरुन शरीर विक्रयासाठी काही तरुणींना तीन हजार रुपयांच्या मोबदल्यात एक महिला पाठवित असल्याची माहिती ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली मनिषानगरातील एका इमारतीमध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने २८ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. त्याठिकाणी दोन महिला दलाल काही पैशांच्या मोबदल्यामध्ये एका महिलेकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करुन घेत असल्याचे पोलिसांच्या बनावट गि-हाईकाला आढळले. त्याने पोलिसांना इशारा केल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोघींनाही ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघींनाही अटक करण्यात आली असून गोपनियतेच्या कारणास्तव त्यांची नावे देण्यास पोलिसांनी नकार दिला.