ठाण्यातील घरात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिलांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 10:05 PM2018-12-04T22:05:09+5:302018-12-04T22:11:43+5:30

ठाण्यातील किसननगरसारख्या गजबजलेल्या निवासी वस्तीमध्येच कुंटणखाना चालविणा-या दोन महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या (एएचटीसी) पथकाने मंगळवारी रात्री अटक केली.

Two women, who run a sex racket in Thane's house, were arrested | ठाण्यातील घरात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिलांना अटक

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाईश्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलपैशाचे अमिष दाखवून सुरु होते प्रकार

ठाणे: किसननगर क्रमांक तीन येथील मातोश्री अपार्टमेंटमधील तळमजल्यावरील एका खोलीत चक्क कुंटणखाना चालविणा-या सुमित्रा शेट्टी (३५) आणि इंदू खरे (४०) या दोन महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. त्यांच्या तावडीतून तीन पिडीत महिलांची सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
किसननगरमधील एका निवासी इमारतीमध्ये कुंटणखाना सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे त्यांनी ४ डिसेंबर रोजी बनावट गि-हाईक पाठवून खातरजमा केली. ही खात्री पटताच सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास दौंडकर यांच्यासह श्रीनगर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमा गावडे यांच्या संयुक्त कारवाईत सुमित्रा आणि इंदू या दोघींना ताब्यात घेण्यात आले. सुमित्रा याठिकाणी दलाल म्हणून काम करीत होती. तर इंदू ही कुंटणखाना चालवित होती. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पैशाचे अमिष दाखवून या पिडीत महिलांकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Two women, who run a sex racket in Thane's house, were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.