फॉरवर्ड प्रेसिजन कंपनीमध्ये चोरी करणाऱ्या दोन कामगारांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 03:32 PM2022-01-07T15:32:04+5:302022-01-07T15:34:39+5:30
अंबिकानगर भागातील फॉरवर्ड प्रेसिजन इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत चोरी करणाºया नितीन कांबळे (३१, रा. इंदिरानगर, ठाणे) आणि रामचंद्र जैस्वार (४९, रा. हनुमाननगर, ठाणे) या दोन कामगारांना अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी शुक्रवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: अंबिकानगर भागातील फॉरवर्ड प्रेसिजन इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत चोरी करणाºया नितीन कांबळे (३१, रा. इंदिरानगर, ठाणे) आणि रामचंद्र जैस्वार (४९, रा. हनुमाननगर, ठाणे) या दोन कामगारांना अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी शुक्रवारी दिली. त्यांच्याकडून चोरीतील सर्वच ४८ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.
वागळे इस्टेट, रोड क्रमांक १६, अंबिकानगर येथे ३० डिसेंबर २०२१ रोजी रात्री ८.३० ते २ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास फॉरवर्ड प्रेसिजन इंजिनिअर्स या कंपनीतून २८ किलाच्या वजनाचे २८ हजारांचे पीवी टू बुश बेअरिंग पार्टस तसेच २० हजारांचे २० किलोचे स्लायडींग बॉडी पॅकिंग प्लेट चोरीस गेले होते. याप्रकरणी कंपनीचे अधिकारी जयप्रकाश सिंग यांनी ३ जानेवारी रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड आणि विजय मुतडक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब निकुंभ, पोलीस हवालदार चंद्रकांत वाळूंज, पोलीस नाईक रोहन जाधव, दीपक बरले, आणि रत्नदीप शेलार आदींच्या पथकाने सीसीटीव्ही फूटेज आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे याच कंपनीतील नितीन आणि रामचंद्र या दोन कामगारांना ३ जानेवारी रोजी रात्री अटक केली. त्यांनी या चोरीची कबूली दिली असून त्यांच्याकडून चोरीतील हा सर्व ४८ हजारांचा ऐवज हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.