मातीचा ढिगारा कोसळून दोन कामगारांचा मृत्यू; एक जखमी, एक सुखरूप

By अजित मांडके | Published: February 23, 2023 08:36 PM2023-02-23T20:36:47+5:302023-02-23T20:37:26+5:30

जखमी कामगारांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू

Two workers killed in landslide; One injured, one safe | मातीचा ढिगारा कोसळून दोन कामगारांचा मृत्यू; एक जखमी, एक सुखरूप

मातीचा ढिगारा कोसळून दोन कामगारांचा मृत्यू; एक जखमी, एक सुखरूप

googlenewsNext

ठाणे : ठाण्यातील नौपाडा बी कॅबिन येथील स्वाद हॉटेलजवळ इमारतीच्या कन्स्ट्रक्शनचे काम चालू होते. त्यावेळी मातीचा मोठा ढिगारा पडल्याची घटना घडली. या ढिगाऱ्या खाली चार कामगार अडकले होते. त्यापैकी दोन कामगारांचा मृत्यू झाला असून एक किरकोळ जखमी असून एक जण सुखरूप आहे. तसेच जखमी कामगारांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. 

बी कॅबिन येथील सत्य नीलम या कन्स्ट्रक्शन साईटवर पाय खोदण्याचे काम सुरू होते. गुरुवारी हे काम सुरू असताना सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास मातीचा ढिगारा घसरल्याने तो पडला. हा ढिगारा काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर पडला. या ढिगाऱ्याखाली चार कामगार अडकले होते. त्यापैकी दोन कंगारांकब मृत्यू झाला असून एक किरकोळ जखमी आहे. तसेच एक कामगाराला सुखरूप बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाला यश आले आहे. 

तसेच जखमी कामगाराला ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. या घटनेची माहिती मिळताच, उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जी. जी.गोदेपुरे,उपायुक्त शंकर पाटोळे, सहा. आयुक्त(नौपाडा प्रभाग समिती), मुख्य अग्निशमन अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी उपस्थित आहेत.

जखमी व्यक्तीचे नाव खालील प्रमाणे:
१) निर्मल रामलाल राब (पु/वय ४९ वर्ष, राहणार शिवाजी नगर, मुंब्रा) यांच्या गळ्याला दुखापत झाली आहे.

मृत व्यक्तींची नावे खालील प्रमाणे:
१) श्री. हबीब बाबू शेख(पु/४२ वर्ष) राहणार शंकर मंदिर, मुंब्रा.
२) श्री. रणजित

Web Title: Two workers killed in landslide; One injured, one safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.