पिकनिकला आलेले दोन युवक खडवलीच्या भातसा नदीत बुडाले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 09:35 AM2019-11-22T09:35:04+5:302019-11-22T09:35:10+5:30
आपल्या मित्रांसोबत खाद्वालेच्या भातसा नदीत पिकनिक करण्यासाठी आलेले दोन युवक पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे.
उमेश जाधव
टिटवाळा -: मुंबईतून येथून आपल्या मित्रांसोबत खाद्वालेच्या भातसा नदीत पिकनिक करण्यासाठी आलेले दोन युवक पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. टिटवाळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असलेल्या खडवली येथील भातसा नदीच्या ठिकाणी गुरुवारी दुपारी मुंबईतील वडाळा परिसरातील मित्रांचा ग्रुप पिकनिकसाठी आले होते. यावेळी दीड वाजण्याच्या सुमारास ते भातसा नदीत पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता दोन तरुण नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नदीत बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली.
पाण्यात पोहत असताना नदीला अचानक पाणी वाढले आणि भवरा तयार झाला त्यात कृष्णा उर्फ श्रीधर धरणे (१९ ) अडकला, यातील दुसरा मित्र अक्षय गोकूळ भरमे वय २१ वर्षे हा त्याला वाचवण्यासाठी गेलेला असताना ते दोघेही खोल पाण्यात बुडून दिसेनासे झाले असल्याची माहिती त्यांचा मित्र प्रसाद राणे यांनी दिली. सदर विद्यार्थी हे मुंबई येथील आयटीआय कॉलेजचे विद्यार्थी असल्याचे समजते.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या जवानांसह स्थानिकांच्या मदतीने नदीपत्रात बुडालेल्या दोघांच्या देहाच्या शोधकार्य सुरू आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा उर्फ श्रीधर धरणे (वय १७वर्षे रा. जोगेश्वरी), तसेच अक्षय गोकूळ भरमे (वय २१वर्षे रा. वडाळा) या ठिकाणी राहणारे आहेत.