दिवा स्थानकात विरुद्ध दिशेने ट्रेन पकडण्याचा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 02:05 AM2020-01-16T02:05:47+5:302020-01-16T02:06:23+5:30

दिव्यामध्ये जेमतेम पाच लाखांची लोकसंख्या आहे़ यामध्ये सर्रासपणे नोकरदारवर्ग राहतो़ सर्व जणच बहुधा लोकलने प्रवास करतात़ त्यामुळेच दिवा स्थानकात लोकल पकडण्यासाठी खच्चून अशी गर्दी प्रवासीवर्गाची दिसते़ सध्या दिव्यात जलद लोकलला थांबा आहे़

Type of catch the train in the opposite direction in the lamp station | दिवा स्थानकात विरुद्ध दिशेने ट्रेन पकडण्याचा प्रकार

दिवा स्थानकात विरुद्ध दिशेने ट्रेन पकडण्याचा प्रकार

Next

मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल पकडण्यासाठी प्रवासी जीव धोक्यात घालून फलाटाच्या विरुद्ध दिशेने ट्रेन पकडण्याचा प्रकार दिवा स्थानकात सकाळी ऐन गर्दीच्या वेळी सर्रासपणे घडत आहे़ पण याकडे पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येते़ दिवा स्थानकात फलाट क्रमांक दोनवर सकाळी गर्दीच्या वेळी ९-१० वाजता सीएसएमटीकडे जाणारी धिमी लोकल पकडण्यासाठी नोकरदार-प्रवासी वर्ग जीव धोक्यात घालतो़

याच वेळेस फलाट क्रमांक तीनवरून जर जलद मार्गाने जाणारी कर्जत, कसारा, कल्याण किंवा अन्य कोणतीही लोकल आली तर इतक्या गर्दीने चढणाऱ्या प्रवासी-नोकरदार वर्गाच्या मोठ्या प्रमाणात अपघाताची शक्यता आहे़ यावर वेळीच लक्ष देऊन प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून हा प्रकार थांबविणे गरजेचे असल्याचे मत दक्ष प्रवासी व्यक्त करीत आहेत.

लोकल प्रवासात गर्दीच्या वेळी अनेक अपघात घडतात़ डब्यात घुसू न देणे, ट्रेन पकडली तरी त्या प्रवाशाला ताटकळत फूटबोर्डवर बाहेर लोंबकळत ठेवून त्याच्या अपघाताचा व्हिडीओ काढणे; परंतु मदतीचा हात न देणे़ सर्व काही पद्धतशीरपणे दुसऱ्यांच्या जीवाचा खेळ करतात़ ‘तुमचा खेळ होतो, मात्र आमुचा जीव जातो’ या म्हणीप्रमाणे रेल्वे प्रवासी काटेकोरपणे इतर प्रवाशांशी वागताना दिसतात़
शब्दांकन : जयेश गायकवाड

‘फूटबोर्ड अडवणाºयांवर कारवाई करा’
दिव्यामध्ये जेमतेम पाच लाखांची लोकसंख्या आहे़ यामध्ये सर्रासपणे नोकरदारवर्ग राहतो़ सर्व जणच बहुधा लोकलने प्रवास करतात़ त्यामुळेच दिवा स्थानकात लोकल पकडण्यासाठी खच्चून अशी गर्दी प्रवासीवर्गाची दिसते़ सध्या दिव्यात जलद लोकलला थांबा आहे़ परंतु सीएसएमटीकडे जाणारी जलद लोकल पकडण्यासाठी जर सकाळी ९ ते १० दरम्यान प्रयत्न केला तर ग्रुपने फूटबोर्ड अडवून उभे राहणारे प्रवासी फलाटावरील प्रवाशांना आत येण्यास मज्जाव करतात़ यातून जर प्रवासी चढलाच तर त्याला ताटकळत प्रवास करायला भाग पाडतात़ यातून त्या प्रवाशाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ रेल्वे अधिनियमानुसार अशा अडवणूक करणाºया प्रवाशांवर कारवाईची मागणी दिव्यातील नोकरदार प्रवाशांकडून होत आहे़

Web Title: Type of catch the train in the opposite direction in the lamp station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे