सातव्या आयोगासाठी लाक्षणिक उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:38 AM2021-03-06T04:38:12+5:302021-03-06T04:38:12+5:30
भिवंडी : राज्य सरकारने २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांनी ...
भिवंडी : राज्य सरकारने २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांनी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केलेला आहे. मात्र, भिवंडी पालिकेने अजूनही तसा ठराव सरकारकडून मंजूर करून घेतला नसल्याने कर्मचाऱ्यांना आजही या आयोगापासून वंचित राहावे लागत असल्याने मंगळवारी ते लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
भिवंडी पालिका कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी मुख्यालयासमोर उपोषण करणार आहेत. कोरोनाचे नियम पाळून हे उपोषण केले जाणार असून या ठिकाणी कामगार, कर्मचाऱ्यांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, कोणत्याही प्रकारचा बंद, संप, काम बंद केले जाणार नाही. या महिन्यात आयोग लागू करण्याचा ठराव सरकारकडून मंजूर करून न आणल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा समितीचे महेंद्र कुंभारे यांनी दिला आहे.