उद्धव ठाकरेंच्या आदेशाला ठाण्यात शिवसेनेची तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 10:25 PM2018-12-18T22:25:08+5:302018-12-18T22:36:13+5:30

मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वारंवार विरोध केला आहे. मात्र, त्यांचे ठाण्यातील शिलेदार याच बुलेट ट्रेनसाठी दिवा पंचक्रशीतील नागरी सुविधांसाठी आरक्षित भूखंडावरील ‘आरक्षण’ उठविण्याचा ठराव ठाणे महापालिकेमध्ये मांडत आहे.

Uddhav Thackeray's order stalled Shiv Sena in Thane | उद्धव ठाकरेंच्या आदेशाला ठाण्यात शिवसेनेची तिलांजली

राष्टÑवादी कॉंग्रेसचा आरोप

Next
ठळक मुद्देबुलेट ट्रेनसाठी सुविधांची आरक्षणे उठवणारआमदार हट्टासाठी २२ कोटींची उधळपट्टीराष्टÑवादी कॉंग्रेसचा आरोप

ठाणे: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनला वारंवार विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, त्यांचे ठाण्यातील शिलेदार याच बुलेट ट्रेनसाठी दिवा पंचक्र ोशीतील नागरी सुविधांसाठी आरक्षित भूखंडावरील ‘आरक्षण’ उठविण्याचा ठराव ठाणे महापालिकेमध्ये मांडत आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे ठाण्याची शिवसेना आपल्याच पक्षप्रमुखांच्या विचारांना तिलांजली देत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहाराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी केला आहे.
येत्या बुधवारी होणाऱ्या महासभेमध्ये ठाणे शहराच्या हिताचे नसलेले काही प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेकडून आणले जाणार आहेत. या प्रस्तावांना राष्ट्रवादीचे नगरसेवक तीव्र विरोध करणार आहेत, याची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई, मुकूंद केणी, सिराज डोंगरे आदी उपस्थित होते.
परांजपे पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी बुलेट ट्रेनला विरोध केला आहे. त्यांच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करीत आहोत. पण, त्यांच्याच पक्षाचे ठाण्यातील लोकप्रतिनिधी मात्र त्यांना जुमेनासे झाले आहेत. त्यामुळेच पक्षप्रमुखांची भूमिका डावलून चक्क दिवा, म्हातार्डी, दातिवली, आगासन आणि पडले आदी गावातील सुमारे १९.४९ हेक्टर भूखंडांवरील आरक्षण हटविण्याचे प्रस्ताव आणले जात आहेत. या भूखंडांवर ठामपाच्या प्रभाग समितीच्या कार्यालयाबरोबर शाळा, रु ग्णालये, मलउदंचन केंद्राची उभारणी करण्यात येणार होती. अतिरिक्त १७.१३ हेक्टर भूखंडावर म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचे स्टेशन उभारण्यात येणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मुंबईला जाण्याचा त्रास वाचावा आणि विद्यार्थ्यांना विद्यापीठ उपकेंद्रामध्ये नवनवीन शिक्षण पद्धतींचा अभ्यास करता यावा, चांगल्या सुविधा उपकेंद्रात मिळाव्यात या हेतूने विद्यापीठ उपकेंद्रासाठी २० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. या निधीला ठाणे महापौरांनी विरोध केला होता. आता एका ‘प्रतापी’ आमदाराच्या आग्रहास्तव संरक्षित अशा उपवन तलावात तरंगता रंगमंच बांधण्यासाठी २२ कोटींची तरतूद करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. याआधीही ठाण्यात बॉलीवूड पार्क, थीम पार्क, सुगंधी झाडे इत्यादी कल्पक तसेच आकर्षक प्रकल्पांच्या नावाखाली भ्रष्टाचार झालेला आहेच. तरीही,आमदार हट्टासाठी २२ कोटींची खैरात करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे. ५.९५ एकरमध्ये विस्तारलेले उपवन तलाव हे संरक्षित पाणथळ प्रकारात मोडत असल्याने उच्च न्यायालयाने तलावामध्ये बांधकामास मनाई केली आहे. तरीही, एका आमदारासाठी २२ कोटींचा निधी देऊन भ्रष्टाचाराचे कुरण तयार केले जात असून त्यास राष्ट्रवादीचे नगरसेवक तीव्र विरोध करणार आहेत. त्यामुळे प्रशासनानेही सत्ताधाºयांच्या हातचे बाहुले न बनता या भ्रष्टाचाराला सहाय करू नये, असे आवाहनही परांजपे यांनी केले आहे.

Web Title: Uddhav Thackeray's order stalled Shiv Sena in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.