उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात ऑर्थोपेडिकच्या शस्त्रक्रिया ठप्प, रुग्णाचे हाल, ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा
By सदानंद नाईक | Updated: March 7, 2025 19:57 IST2025-03-07T19:56:53+5:302025-03-07T19:57:10+5:30
Ulhasnagar Health News: मध्यवर्ती रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील ऑर्थोपेडिक इंप्लांट शस्त्रक्रिया शासन निधी अभावी गेल्या दोन महिन्यापासून रखडल्याचा आरोप ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने केला.

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात ऑर्थोपेडिकच्या शस्त्रक्रिया ठप्प, रुग्णाचे हाल, ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा
- सदानंद नाईक
उल्हासनगर - मध्यवर्ती रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील ऑर्थोपेडिक इंप्लांट शस्त्रक्रिया शासन निधी अभावी गेल्या दोन महिन्यापासून रखडल्याचा आरोप ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने केला. त्यांनी रुग्णालयाला याबाबत निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, बदलापूर, मुरबाड, अंबरनाथ व ग्रामीण परिसरातून शेकडो रुग्ण उपचार करण्यासाठी येतात. महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत ऑर्थोपेडीक इंप्लांट शस्त्रक्रिया साठी ४ ते ५ रुग्ण गेल्या ऐक ते दोन महिन्यापासून प्रतीक्षेत आहेत. योजने अंतर्गत शस्त्रक्रियासाठी लागणारा निधी रुग्णालयाकडे आला नसून पुरवठाधारक औषध विक्रेत्याचे पैसे थकल्याने, त्याने रुग्णालयाला उधार औषध व शस्त्रक्रिया साहित्य देणे बंद केले. असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला. याबाबत ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांना माहिती मिळाल्यावर, त्यांनी शुक्रवारी पक्षाच्या शिष्टमंडळासह रुग्णालयाला भेट देऊन रुग्णाची चौकशी केली. तसेच रुग्णालय प्रशासनाला निवेदन देऊन वेळीच रुग्णांची शस्त्रक्रिया झाली नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा देत राज्य सरकारचा निषेध केला.
मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे हे एका प्रकरणात गुरुवारी निलंबित झाल्याने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ उत्कर्ष दुधेडिया यांच्याकडे रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा पदभार आहे. डॉ उत्कर्ष यांनी ऑर्थोपेडीक शस्त्रक्रियासाठी रुग्ण तंदुरस्त असायला हवा. तसेच त्याच्याकडे महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका व आधारकार्ड हवे. आदी कागदपत्रा मध्ये त्रुटी असल्याने, शस्त्रक्रिया रखडली असावी. असे मत व्यक्त केले. १०८ नंबरची रुग्णावाहीका देण्यास ६ तास लागल्याने, गेल्या महिन्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ बनसोडे यांना आरोग्य विभागाने निलंबित केले. त्यानंतर गेल्या दोन महिन्यापासून ऑर्थोपेडीक शस्त्रक्रिया विना रुग्णाचे बेहाल होत असल्याचा प्रकार उघड झाला.