Ulhasnagar: उल्हासनगरच्या झुलेलाल ८ संचालकासह १५ जनावर गुन्हा, जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप

By सदानंद नाईक | Published: February 20, 2023 04:01 PM2023-02-20T16:01:42+5:302023-02-20T16:02:15+5:30

Ulhasnagar: न्यायालयाचा स्टे असतांना व जागा फिर्यादी अर्जुन रामरख्यानी यांच्या ताब्यात असतांना जागेचे बनावट बक्षीस प्रमाणपत्र बनवून वादीत जागेवर रस्ता बनविल्याचा प्रकार घडला.

Ulhasnagar: 15 animal crime, land encroachment charges with 8 director of Ulhasnagar | Ulhasnagar: उल्हासनगरच्या झुलेलाल ८ संचालकासह १५ जनावर गुन्हा, जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप

Ulhasnagar: उल्हासनगरच्या झुलेलाल ८ संचालकासह १५ जनावर गुन्हा, जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप

googlenewsNext

- सदानंद नाईक

उल्हासनगर : न्यायालयाचा स्टे असतांना व जागा फिर्यादी अर्जुन रामरख्यानी यांच्या ताब्यात असतांना जागेचे बनावट बक्षीस प्रमाणपत्र बनवून वादीत जागेवर रस्ता बनविल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी झुलेलाल ट्रस्टच्या ८ संचालकासह एकून १५ जनावर जागेवर अतिक्रमण केल्या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगर येथील बैरेक नं-४७८ च्या बाजूची यु-नंबर-६४ अश्या प्रकारच्या एका मिळकतीवर जागेवर उच्च न्यायालयाने स्टे दिले असतांना व सदर जागा फिर्यादी अर्जुन उर्फ अज्जू रामरख्यानी यांच्या ताब्यात आहे. अश्यावेळी झुलेलाल ट्रस्टच्या ८ संचालकासह इतर ५ ते ७ सहकाऱ्यांनी संगनमत करून सन-१९८० च्या जुन्या ५ रुपये किंमतीच्या स्टॅम्प पेपरवर वादीत मिळकत जागा झुलेलाल टेस्ट शाळेच्या संचालक सदस्य यांना प्रेमचंद पेसुमल यांनी बक्षीसपत्राने दिले. असे खोटे बक्षीसपत्र बनवून त्याचा उपयोग अर्जुन रामरख्यानी यांची जागा गिलंकृत करण्यासाठी कोकणभवन येथे रिव्हिजन पिटीशन नंबर ०६/२०२१ मध्ये करून रामरख्यानी यांच्या कब्जात असलेल्या जागेत लावलेले संरक्षण पत्रे तोडून त्याजागी कच्चा रस्ता बांधून अतिक्रमण केल्या प्रकरणी झुलेलाल ट्रस्टच्या ८ संचालकासह इतर ५ ते ७ सरकारी असे एकून १५ जणांवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

उल्हासनगर पोलीस याबाबत अधिक चौकशी करीत असून झुलेलाल ट्रस्ट स्कुल संचालकांना अटक होते का? याकडे सर्वांचें लक्ष लागले आहे. याबाबत झुलेलाल ट्रस्ट संचालक यांच्या सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता झाला नाही. मात्र याप्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Ulhasnagar: 15 animal crime, land encroachment charges with 8 director of Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.