Ulhasnagar: खिडकीचे गज वाकवून ठोकली धूम; शासकीय निरीक्षण गृहातून ८ मुली पळाल्या
By सदानंद नाईक | Updated: January 9, 2025 20:51 IST2025-01-09T20:46:14+5:302025-01-09T20:51:14+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात शांतीभवन येथे शासकीय मुलीचे निरीक्षणगृह आहे. याठिकाणी घरातून पळून आलेल्या मुली, रेल्वे, बस स्थानक आदी ठिकाणी सापडलेल्या अल्पवयीन मुली ठेवण्यात येतात.

Ulhasnagar: खिडकीचे गज वाकवून ठोकली धूम; शासकीय निरीक्षण गृहातून ८ मुली पळाल्या
उल्हासनगर : शहरातील शासकीय मुलीच्या निरीक्षणगृहातून मंगळवारी पहाटे ३ वाजता ८ मुली पळून गेल्याची घटना घडली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पथकाने कल्याण व विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान पळून गेलेल्या ८ पैकी ७ मुलीचा शोध घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात शांतीभवन येथे शासकीय मुलीचे निरीक्षणगृह आहे. याठिकाणी घरातून पळून आलेल्या मुली, रेल्वे, बस स्थानक आदी ठिकाणी सापडलेल्या अल्पवयीन मुली ठेवण्यात येतात.
चौघींनी खिडकीचे गज वाकवले अन्...
मंगळवारी पहाटे ३ वाजता एकूण ८ मुलींनी संगणमत करून खिडकीचे लोखंडी गज वाकून निरीक्षणगृहातून पळ काढला. मुली पळून गेल्याची माहिती रात्री निरीक्षणगृहाच्या सुरक्षारक्षकांच्या लक्षात आल्यावर, त्यांनी हिललाईन पोलीस ठाण्याला माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य बघून पोलिसांनी गुन्हा दाखल करून, पोलीस पथके मुलीच्या शोधार्थ पाठविले होते. पोलीस पथकाने कल्याण व विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान ८ पैकी ७ मुलीला शोधण्यात यश आले. मात्र ऐक मुलगी पळून जाण्यात यशस्वी झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली.
निरीक्षण गृहातून मुली पळून का गेल्या?
फरार मुलीचा शोध पोलीस पथक घेत असून सापडलेल्या ७ मुली पुन्हा मुलीच्या निरीक्षणगृहात पोलीस बंदोबस्तात ठेवल्या आहेत.
शासकीय मुलीचे निरीक्षणगृहाच्या अधिक्षिका व्हीव्हीएन सिल्व्हर यांनी निरीक्षणगृहातून पळून गेलेल्या मुली सापडल्याची माहिती दिली. सर्व मुली उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आदी ठिकाणच्या रहिवासी असून त्यांच्या घराचा पत्ता शोधण्याचे काम पोलीस करीत आहेत.
पळून गेलेल्या मुलींना घरी जायचे होते. म्हणून त्या पळून गेल्याची माहिती सिल्व्हर यांनी दिली. तर हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या चौकशीत मुलीना सुखसुविधा व जेवण नियमित तसेच चांगले दिले जात नाही म्हणून पळून गेल्याचे म्हटले.
महिला केअरटेकर, महिला पोलीस बंदोबस्त निरीक्षणगृहाला २४ तास असताना मुली पळून गेल्याची घटना घडल्याने, मुलीच्या निरीक्षणगृहाच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे.