उल्हासनगरात व्याजखोरांच्या त्रासाला कंटाळून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; एका आठवड्यातील दुसरी घटना

By सदानंद नाईक | Published: January 29, 2023 07:11 PM2023-01-29T19:11:56+5:302023-01-29T19:14:42+5:30

महिलेने व्याजखोरांच्या त्रासाला कंटाळून फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून याबाबत स्थानिक पोलीस अनभिज्ञ आहेत. 

ulhasnagar a woman tries to commit suicide after suffering from moneylenders second incident in a week | उल्हासनगरात व्याजखोरांच्या त्रासाला कंटाळून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; एका आठवड्यातील दुसरी घटना

उल्हासनगरात व्याजखोरांच्या त्रासाला कंटाळून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; एका आठवड्यातील दुसरी घटना

googlenewsNext

सदानंद नाईक, उल्हासनगर : व्याजखोरांच्या त्रासाला कंटाळून गिरीश चुग याने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून आपबीती सांगितल्याची घटना घडली होती. त्या पाठोपाठ कॅम्प नं-१ परिसरातील महिलेने व्याजखोरांच्या त्रासाला कंटाळून फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून याबाबत स्थानिक पोलीस अनभिज्ञ आहेत. 

उल्हासनगर कॅम्प नं-१ परीसरात राहणाऱ्या रोहिना अन्सारी महिलेने घरसंसार चालविण्यासाठी २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. काही वर्षात २० हजार रुपयांचे लाखो रुपये व्याज देऊनही शिल्लक रक्कम असल्याचा तगादा व्याजखोरांनी लावला. या त्रासाला कंटाळून महिलेने यापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. २७ जानेवारी रोजी कर्जावरील व्याज घेण्यासाठीं आलेल्या महिलेसमोर त्रासलेल्या रोहिणी अन्सारी हिने आत्महत्या करण्याचा इशारा दिला. तेंव्हा महिलेने आमच्या समोर फाशी घे. असा सल्ला दिला. हा सर्वप्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला असून रिहिणीने व्हायरल केला. तसेच त्रासलेल्या रोहिणीने त्यानंतर फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी नवरा वेळेत घरी आल्याने, रोहिणीला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

रोहिणीने यापूर्वी उल्हासनगर पोलीस ठाण्यात व्याजखोरांच्या त्रासाची तक्रार केली होती. असे रोहिणी अन्सारी हिचे म्हणणे आहे. याबाबत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलपगारे यांच्याशी संपर्क केला असता, याबाबत कोणतीही माहिती नाही. असे त्यांचे म्हणणे आहे.

शहरातील कॅम्प नं-५ येथे राहणाऱ्या गिरीश चुग याला, दोन महिन्यापूर्वी सहकारी मित्राच्या चुगलीमुळे गारमेंट दुकानाच्या मालकाने कामवरून काढून टाकले होते. बेकार झालेल्या गिरीशने घरसंसार चालविण्यासाठी काही जनाकरून दरमहा ४० टक्के व्याजाने कर्ज घेतले मात्र घेतलेले कर्ज वेळत दिले नाही म्हणून पैसे देण्याचा तगादा व्याजखोरांनी लावला. हा सर्वप्रकार घरापर्यंत गेल्यावर, गिरीशने आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला. आत्महत्यापूर्वी त्याने व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. यामध्ये पत्नीची माफी मागून दोन मुलांचा व वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्याची विनंती केली. तसेच पठाणी व्याजाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सांगून त्यांची नावे व्हिडीओ मध्ये सांगितली. याप्रकाराची माहिती स्थानिक हिललाईन पोलिसांना नाही. गिरीश चुग व रोहिणी अन्सारी या दोन्ही प्रकाराबाबत शहरात संताप व्यक्त होत असून कारवाईची मागणी सोशल मीडियावर होत आहे. आमदार कुमार आयलानी यांनी मात्र त्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: ulhasnagar a woman tries to commit suicide after suffering from moneylenders second incident in a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.