Ulhasnagar: देशाच्या पंतप्रधानपदी २०२४ ला नरेंद्र मोदीच, अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला विश्वास

By सदानंद नाईक | Published: June 4, 2023 08:59 PM2023-06-04T20:59:02+5:302023-06-04T20:59:56+5:30

Anurag Thakur: एकदिवसीय शहर दौऱ्यावर आलेले अनुराग ठाकूर यांनी शहरातील समस्या बाबत मौन बाळगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामाची माहिती दिली.

Ulhasnagar: Anurag Thakur expressed his belief that Narendra Modi will be the Prime Minister of the country in 2024. | Ulhasnagar: देशाच्या पंतप्रधानपदी २०२४ ला नरेंद्र मोदीच, अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला विश्वास

Ulhasnagar: देशाच्या पंतप्रधानपदी २०२४ ला नरेंद्र मोदीच, अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला विश्वास

googlenewsNext

- सदानंद नाईक 
उल्हासनगर : एकदिवसीय शहर दौऱ्यावर आलेले अनुराग ठाकूर यांनी शहरातील समस्या बाबत मौन बाळगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामाची माहिती दिली. तसेच सन-२०२४ मध्ये मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचे संकेत दिले आहे.

उल्हासनगर दौऱ्यावर आलेले केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर हे शहरातील विविध समस्या बाबत बोलतील. असे नागरिकांना वाटत होते. मात्र त्यांनी टॉउन हॉल मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत शहर समस्या बाबत मौन बाळगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षात केलेल्या विविध विकास कामाचा पाढा वाचला. मुद्रा लोण, शेतकऱ्यांना आर्थिक मदत, घरगुती गॅस, नळजोडणी, शौचालय, मेट्रो ट्रेन, बुलेट ट्रेन, देशाचा विकासाचा आलेख, सरंक्षण साहित्यात पूर्णत्व आदीं विकास कामाबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच ओडिशा येथे झालेल्या रेल्वे अपघातात विरोधकांनी राजकारण न करता, सहकार्य करण्याचे आवाहन केले. मोदी यांचा झंझावात देश नव्हेतर जग ओळखून असून सन-२०२४ ला पूर्णबहुमतात मोदी सरकार येणार असल्याचे अनुराग ठाकूर म्हणाले.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी गेल्या निवडणुकीत शहरातील रस्ते, पाणी टंचाई, स्वच्छता आदी समस्या बाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. तसेच पुढील दौऱ्यात याबाबत आढावा घेणार असल्याचा दम अधिकाऱ्यांना दिला होता. मात्र या शहर दौऱ्यात शहर समस्या बाबत केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी मौन बाळगल्याची टीका होत आहे. ९ लाख लोकसंख्येच्या शहरात एकही मैदान नसल्याचा प्रश्न पत्रकारांनी ठाकूर यांना केल्यावर, त्यांनी यावर बोलणे टाळले. एकूणच त्यांनीं शहरातील सिंधी समाजाचे पवित्रस्थळांना भेट देऊन ट्रस्टी सोबत चर्चा केली. सिंधू सर्कल मध्ये झालेल्या कार्यक्रमात सिंधी चॅनेल सुरू करण्याची मागणी यावेळी केली. तसेच भाजपचे जिल्हा कार्यालयाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. एकूणच अनुराग ठाकूर यांचा दौरा नेमका कोणासाठी व कश्यासाठी? असा प्रश्न शहरातून विचारला जात आहे. पत्रकार परिषदेत आमदार संजय केळकर, कुमार आयलानी, शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, प्रकाश माखिजा, प्रदीप रामचंदानी, गुलाब करनजुळे आदीजन उपस्थित

Web Title: Ulhasnagar: Anurag Thakur expressed his belief that Narendra Modi will be the Prime Minister of the country in 2024.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.