उल्हासनगरच्या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार: सूत्रधार मायकल अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 05:25 PM2020-12-11T17:25:07+5:302020-12-11T17:27:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : उल्हासनगर येथील बांधकाम व्यावसायिक संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार करीत डोक्यावर हल्ला करून त्यांच्या खूनाचा ...

Ulhasnagar builder fired upon: Facilitator Michael finally arrested | उल्हासनगरच्या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार: सूत्रधार मायकल अखेर जेरबंद

ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई

Next
ठळक मुद्दे ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाईयापूर्वी नाशिक येथून केली होती दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : उल्हासनगर येथील बांधकाम व्यावसायिक संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार करीत डोक्यावर हल्ला करून त्यांच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्या संतोष रमेश ढवळे उर्फ मायकल (४८, रा. डोंबिवली) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी अटक केली आहे. त्याला १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
कल्याण पश्चिम भागात संदीप यांच्या ताब्यात एक जागा होती. ती जागा मायकल याला पाहिजे होती. यातूनच त्यांच्यात गेली अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. २२ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उल्हासनगरमधील श्रीराम चौकातील एका बारमधून संदीप आणि त्याचा मित्र जहागीर मोरे हे दोघेही बाहेर पडले. त्यानंतर ते त्याठिकाणी रस्त्यावर गप्पा मारीत उभे होते. त्याचवेळी एका कारमधून आलेल्या हितेश ठाकुर (२३) आणि सागर शिंदे (२३) या दोघांनी संदीप गायकवाड यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करीत गावठी रिव्हॉल्व्हरमधून तीन राउंड फायर केले. यात संदीप गंभीर जखमी झाला. या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने २४ आॅक्टोंबर रोजी हितेश आणि सागर या दोघांना नाशिक येथून अटक केली. त्यानंतर २९ आॅक्टोंबर रोजी त्यांचा तिसरा साथीदार शाहरुख शेख यालाही अटक केली. यातील सूत्रधार मायकल हा गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्यालाही कोथमिरे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक संजय शिंदे आणि सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या पथकाने उल्हासनगर येथून १० डिसेंबर रोजी अटक केली.
* मायकल याने आपली अटक वाचविण्यासाठी न्यायालयामार्फतीनेही बरेच प्रयत्न केले. मुंबई उच्च न्यायालयानेही त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाल्यानंतर अखेर ठाणे खंडणी विरोधी पथकाने त्याला अटक केली.

Web Title: Ulhasnagar builder fired upon: Facilitator Michael finally arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.