उल्हासनगर छत्रपती शाहू महाराज उड्डाणफुलाची दुरावस्था, रस्त्याची दुरुस्ती कागदावर
By सदानंद नाईक | Published: July 15, 2023 04:28 PM2023-07-15T16:28:39+5:302023-07-15T16:29:26+5:30
मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उल्हासनगर : कॅम्प नं-३ व ४ ला जोडणाऱ्या छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूलावर खड्डे पडल्याने, मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दोन महिन्यापूर्वीच पुलाच्या रस्त्याची दुरुस्ती करून रस्ता खड्डेमय झाल्याने संबंधीत ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
उल्हासनगरातील ७० टक्के पेक्षा जास्त रस्ते सिमेंटकाँक्रीटचे असल्यावर व रस्ता दुरुस्तीवर कोट्यावधीचा खर्च करून रस्त्याची दुरावस्था झाल्याचे चित्र शहरात आहे. कॅम्प नं-३ व ४ ला जोडणाऱ्या छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले असून गेल्या आठवड्यात खड्डे रेती, माती, दगड खडी टाकून भरण्यात आले होते. मात्र संततधार पावसाने पुलाच्या रस्त्याची दुरावस्था होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शुक्रवारी अपघाताचे ठिकाण झालेल्या शहाड उड्डाण पुला खालील रस्त्याची महापालिकेने डागडुजी करून स्पीडब्रेकर बसविण्यात आला. मात्र शांतीनगर डॉल्फिन रस्ता, फॉरवर्ड लाईन चौक, गायकवाड पाड्यातील रस्ते, काली मातामंदिर ते कैलास कॉलनी रस्ता आदी अनेक रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
महापालिका बांधकाम विभागाने रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी ५ कोटीच्या निधीतून निविदा काढल्या आहेत. मात्र संततधार पाऊस असल्याने, रस्त्यातील खड्डे तात्पुरता स्वरूपात दगड, माती, रेतीने भरण्यात येत आहे. फॉरवर्ड लाईन, खेमानी चौक परिसर, उल्हासनगर जुना बस स्टॉपकडून बिर्ला गेटकडे जाणारा रस्ता खड्ड्याने धोकादायक झाला असून महापालिकेने रस्त्यातील खड्डे भरण्याची मागणी होत आहे. महापालिकेचा ४० कोटीचा निधी, शासनाचा मूलभुत सुविधेसाठी आलेला ४५ कोटीचा निधी, एमएमआरडीएचा रस्त्यासाठीचा १४३ कोटी आदी निधी रस्ता विकासासाठी आणूनही रस्त्याची दैना झाल्याने, निधी नेमका जातो कुठे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.