उल्हासनगरातून दोन बांगलादेशी महिलांसह चौघांना अटक, शहर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
By सदानंद नाईक | Updated: March 7, 2025 18:16 IST2025-03-07T18:15:54+5:302025-03-07T18:16:13+5:30
Ulhasnagar Crime News: उल्हासनगर शहर गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी सायंकाळी आडवली ठोकली गावातून लिव्ह अँड रिलेशनसीप मध्ये राहणाऱ्या दोन बांगलादेशी महिलेसह चौघाना अटक केली.

उल्हासनगरातून दोन बांगलादेशी महिलांसह चौघांना अटक, शहर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
- सदानंद नाईक
उल्हासनगर - शहर गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी सायंकाळी आडवली ठोकली गावातून लिव्ह अँड रिलेशनसीप मध्ये राहणाऱ्या दोन बांगलादेशी महिलेसह चौघाना अटक केली. त्यांना मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली.
उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांना काही बांगलादेशी महिला आडवली ठोकली गावात राहत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे विभागाच्या पथकाने फरझाना शिरागुल शेख या ३६ वर्षीय बांगलादेशी महिलेला तसेच तीच्या सोबत लिव्ह अँड रिलेशनसीप मध्ये राहणाऱ्या ताहीर मुनीर अहमद खान यांना अटक केली. तर दुसऱ्या घटनेत भील उर्फ प्रीती नूर इस्लाम अख्तर हिला तसेच ती लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या गणेश चंद्रदास यांला अटक केली. अटक केलेल्या चौघाना मानपाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिल्यावर गुन्हा दाखल केला. शहर गुन्हे अन्वेषण विभागाने गेल्या दोन महिन्यात २० पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिकांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली आहे.