उल्हासनगर डम्पिंग ग्राऊंडची आग बेकाबू, सर्वत्र धुराचे साम्राज्य; हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 04:26 PM2021-03-11T16:26:11+5:302021-03-11T16:27:56+5:30

Ulhasnagar Dumping Ground Fire : शहरातील कॅम्प नं-५ खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंडवर उंचचा उंच कचऱ्याचा ढिग निर्माण झाला असून महापालिका पर्यायी डम्पिंग जागेच्या शोधात आहे.

Ulhasnagar dumping ground fire uncontrollable, smoke realm everywhere; The health of thousands of citizens is in danger | उल्हासनगर डम्पिंग ग्राऊंडची आग बेकाबू, सर्वत्र धुराचे साम्राज्य; हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात

उल्हासनगर डम्पिंग ग्राऊंडची आग बेकाबू, सर्वत्र धुराचे साम्राज्य; हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात

googlenewsNext
ठळक मुद्देमहाशिवरात्री मध्ये कचऱ्याचे ढिग लागू नये म्हणून, डम्पिंगला आग लागली असता, कचरा उचलण्याचे काम कोणार्क कंपनीने सुरू ठेवला आहे. एकूणच कचऱ्याच्या नावाने काहीजण स्वतःचे चांगभले करून घेत असल्याची टीका सर्वत्र होत आहे. 

सदानंद नाईक
 

उल्हासनगर : खडी खदान डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान गेल्या २० तासापासून प्रयत्न करीत असून आगीचे लोट जैसे थे आहे. आगीने कॅम्प नं-५ परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण होऊन हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. 

शहरातील कॅम्प नं-५ खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंडवर उंचचा उंच कचऱ्याचा ढिग निर्माण झाला असून महापालिका पर्यायी डम्पिंग जागेच्या शोधात आहे. दरम्यान बुधवारी सायंकाळी डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला आग लागल्याने, परिसरात आगीने धुराचे साम्राज्य निर्माण झाले. महापालिका अधिकाऱ्यांसह स्थानिक नगरसेवक व शिवसेनेचे उपशहरप्रमुख अरुण अशान यांनी डम्पिंग ग्राऊंडकडे धाव घेऊन आगीचा आढावा घेतला. अग्निशमन दलाचे जवान गेल्या २० तासापासून डम्पिंगला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आग बेकाबू झाल्याने, आग आटोक्यात केंव्हा येणार?. याकडे सर्वांचे लक्ष लागले. महापालिकेने स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

 महापालिकेने गेल्या महिन्यात डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचे सपाटीकरण करण्याचा ठेका खाजगी कंपनीला देऊन, जेसीबीसह अन्य मशीन देण्याला स्थायी समितीने दिली. त्यावर ७५ लाखाचा जास्तीचा खर्च महापालिका करणार आहे. एकीकडे शहरातील कचरा उचलणे, डम्पिंगवरील कचऱ्याचे सपाटीकरण करणे, शहरातील डेब्रिज उचलणे आदींवर कोट्यवधींचा खर्च करूनही कचऱ्याचा प्रश्न जैसे थे आहे. महाशिवरात्री मध्ये कचऱ्याचे ढिग लागू नये म्हणून, डम्पिंगला आग लागली असता, कचरा उचलण्याचे काम कोणार्क कंपनीने सुरू ठेवला आहे. एकूणच कचऱ्याच्या नावाने काहीजण स्वतःचे चांगभले करून घेत असल्याची टीका सर्वत्र होत आहे. 

डम्पिंगवर कचरा टाकण्यास स्थानिकांचा विरोध 

खडी खदान येथें कचरा टाकण्यास पहिल्या दिवसापासून स्थानिक नागरिक व नगरसेवक विरोध करीत आहेत. येथील डम्पिंग हटविण्यासाठी ठिय्या आंदोलन, रस्ता रोको, उपोषण, महासभेत आंदोलन करून विरोध दर्शविला. डम्पिंगवरील कचऱ्याच्या आगीने विरोध तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Web Title: Ulhasnagar dumping ground fire uncontrollable, smoke realm everywhere; The health of thousands of citizens is in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.