उल्हासनगरात निवडणूक भरारी पथकाने पकडले साडेसहा लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 22:38 IST2019-04-20T22:38:10+5:302019-04-20T22:38:17+5:30
शहाड म्हराळगाव नाक्यावर निवडणूक आचारसंहिता भरारी पथकाने सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान एका कार मधून साडेसहा लाख रुपये रोख जप्त केले.

उल्हासनगरात निवडणूक भरारी पथकाने पकडले साडेसहा लाख रुपये
उल्हासनगर - शहाड म्हराळगाव नाक्यावर निवडणूक आचारसंहिता भरारी पथकाने सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान एका कार मधून साडेसहा लाख रुपये रोख जप्त केले. याप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून भरारी पथकाचे नोडल अधिकारी युवराज भदाणे, संदीप जाधव यांनी ही कारवाई केली.
उल्हासनगर महारळगाव नाक्यावर निवडणूक नोडल अधिकारी भदाणे आपल्या सहकार्या सोबत गाड्यांची तपासणी करीत होते. त्यावेळी एम एच 04 इ टी 9942 हि इनोव्हा गाडी तिथे आली,भरारी पथकाने या गाडीची तपासणी केली असता त्या गाडीत साडे सहा लाख रुपयांची रक्कम आढळून आली ,यावेळी गाडीचे मालक अजबराट नाडर यांना सदर पैश्याबाबत नोडल अधिकारी भदाणे यांनी विचारणा केलीअसता, त्याने असमाधानकारक उत्तरे दिली नाही. भदाणे यांनी नाडर यांना कार व पैश्यासह उल्हासनगर पोलीसांच्या ताब्यात दिले. याबाबत पोलीस अधिक तपास करीत असून कल्याण निवडणूक निर्णय अधिकारी यांना याबाबत माहिती देण्यात आल्याची माहिती युवराज भदाणे यांनी दिली आहे. उल्हासनगर पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहे.