उल्हासनगर पोटनिवडणूक : ओमींचे बाउंसर, राष्ट्रवादीत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 06:27 AM2018-04-07T06:27:26+5:302018-04-07T06:27:26+5:30

महापालिका पोटनिवडणुकीत हाणामारीचे दोन अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. ३८ टक्के मतदान झाले. शुक्रवारी सकाळी संथगतीने सुरू झालेले मतदान शेवटच्या दोन तासात वाढले.

Ulhasnagar by-election: Omni's bouncer, NCP fight | उल्हासनगर पोटनिवडणूक : ओमींचे बाउंसर, राष्ट्रवादीत हाणामारी

उल्हासनगर पोटनिवडणूक : ओमींचे बाउंसर, राष्ट्रवादीत हाणामारी

Next

उल्हासनगर - महापालिका पोटनिवडणुकीत हाणामारीचे दोन अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. ३८ टक्के मतदान झाले. शुक्रवारी सकाळी संथगतीने सुरू झालेले मतदान शेवटच्या दोन तासात वाढले. मतदान केंद्रासमोर रांगा लागल्या होत्या. दसरा मैदान येथील शिवसेना शाखेसमोर ओमी कलानी यांचे बाऊंसर व राष्ट्रवादी पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. तर भाटिया चौकात राष्ट्रवादीचे गंगोत्री व ओमी आमनेसामाने आल्याने वातावरण तणावग्रस्त झाले होते.
प्रभाग क्रमांक १७ ची पोटनिवडणूक भाजपा-ओमी टीम व राष्ट्रवादी-शिवसेनेने प्रतिष्ठेची केली होती. सकाळपासूनच ओमी सहकाऱ्यांसोबत प्रभागात ठाण मांडून बसले होते. त्यांच्या सोबतीला ओमी टीमच्या पदाधिकाºयांसह भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी, प्रदेश सचिव प्रकाश माखिजा उपस्थित होते. तर दुसºया बाजूला राष्ट्रवादीचे शहर निरीक्षक सुधाकर वडे, नगरसेवक सुनिता बगाडे, माधव बगाडे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, गटनेते रमेश चव्हाण, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, उपशहरप्रमुख दिलीप गायकवाड होते.
कॅम्प नं-५ येथील दसरा मैदानाशेजारील शिवसेना शाखेसमोर राष्ट्रवादीचे शंकर यांच्यासह दोन कार्यकर्ते व ओमी यांचे बाऊंसर समोरासमोर आले. त्यांच्यात वाद होवून हाणामारी झाली. हिललाईन पोलिसांनी त्वरीत धाव घेवून दोन्ही गटातील ११ जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये कलानी यांच्या ९ बाऊंसरचा समावेश होता. त्यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. भाटिया चौकात ओमी समर्थकांसह आल्याचे समजताच राष्ट्रवादीचे गंगोत्री हेही समर्थकांसह चौकात गेले.
दोन्ही आमनेसामने आल्यावर तू तू मैं मैं झाली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अधिक असल्याने ओमी यांनी काढता पाय घेतला. पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी प्रभागाचा आढावा घेवून राज्य राखीव दलाच्या जवानांसह चोख बंदोबस्त ठेवला होता.

आज सकाळी मतमोजणी
प्रभाग समिती क्रं-४ मध्ये उद्या सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार असून अर्ध्या तासात निकाल जाहीर होईल अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.

बाजी कोण मारणार?
ओमी टीमच्या साक्षी पमनानी, राष्ट्रवादीच्या तिकीटावर सुमन सचदेव, काँॅग्रेस पक्षाच्या तिकीटावर जया साधवानी व अपक्ष म्हणून सुरेखा सोनावणे निवडणूक रिंगणात होते.

Web Title: Ulhasnagar by-election: Omni's bouncer, NCP fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.