उल्हासनगर गोळीबार प्रकरण: व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार न्यायालयीन सुनावणी

By अजित मांडके | Published: February 3, 2024 03:11 PM2024-02-03T15:11:20+5:302024-02-03T15:11:51+5:30

भाजपा आमदार गणपत गायकवाडांचा गोळीबाराचा व्हिडीओही व्हायरल

Ulhasnagar firing case: Court hearing to be held through video conferencing | उल्हासनगर गोळीबार प्रकरण: व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार न्यायालयीन सुनावणी

उल्हासनगर गोळीबार प्रकरण: व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार न्यायालयीन सुनावणी

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: भाजप आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे दोन साथीदार यांना शनिवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार होते. त्यामुळे न्यायालय परिसरात गणपत गायकवाड समर्थक आणि महेश गायकवाड समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. यावेळी दोन्ही गटात वादंग होण्याची शक्यता तसेच आमदार गणपत गायकवाड यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आमदार गायकवाड यांना न्यायालयात थेट हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे न्यायालयात सुनावणी पार पडनार आहे. त्यानुसार त्यांना ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. या ठिकाणी चोक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यानची कसून चॉकशी करून आत सोडले जात होते. तसेच या भागात ठीक ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

काय घडली घटना?

भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात मध्यरात्री उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यामध्येच झालेल्या राड्यामुळे खळबळ उडाली. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी, गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली.

Web Title: Ulhasnagar firing case: Court hearing to be held through video conferencing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.