एका दिवसात अवैध बांधकामांवरील कारवाई थंड; गांधीरोड येथे जेसीबीने झाड तोडले, विजेचा खांब पडला घरावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 07:06 PM2021-08-14T19:06:48+5:302021-08-14T19:09:44+5:30
उल्हासनगरात कुछ भी हो शकता है. असे एका कार्यक्रमात तत्कालीन महापालिका आयुक्तांनी म्हटले होते. याचाच प्रत्यय शहरात वेळोवेळी येत असतो.
उल्हासनगर- कॅम्प नं-५ गांधी रोड परिसरात ब्लॉकच्या पडलेल्या ठिकाणी शनिवारी सकाळी जेसीबीने विना परवाना पिंपळाचे झाड तोडले. तोडलेल्या झाडामुळे विजेचा एक खांब घरावर पडून वीज पुरवठा खंडित झाला. याप्रकारने परिसरात संताप व्यक्त होत असून संबंधीतावर कारवाईची मागणी होत आहे.
उल्हासनगरात कुछ भी हो शकता है. असे एका कार्यक्रमात तत्कालीन महापालिका आयुक्तांनी म्हटले होते. याचाच प्रत्यय शहरात वेळोवेळी येत असतो. शनिवारी सकाळी कॅम्प नं-५ गांधी रोड येथील एका बांधकाम ठिकाणी जेसीबी मशीन येऊन बांधकाम ठिकाणावरील पिंपळाचे झाड तोडून टाकले. झाड विजेच्या खांब व तारावर पडल्याने, विजेचा खांब एका घरावर पडून वीज पुरवठा खंडित झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. शहरात सर्रासपणे आरसीसीचे अवैध बांधकामे उभे राहत आहेत.
गेल्या आठवड्यात अतिक्रमण विभागाने बहुमजली चार पेक्षा जास्त अवैध बांधकामावर कारवाई केल्यावर, पाडकाम कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत दिले होते. मात्र एका दिवसाच्या कारवाईनंतर पाडकाम कारवाई थंड पडल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे.