उल्हासनगर खेमानी सिमेंट काँक्रीट रस्त्याला एका वर्षात तडे, रस्त्याचे होणार ऑडिट
By सदानंद नाईक | Published: September 3, 2023 06:07 PM2023-09-03T18:07:17+5:302023-09-03T18:07:30+5:30
कॅम्प नं-२, खेमानी ते रमाबाई आंबेडकर टेकडी दरम्यान बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्याला एका वर्षात तडे गेल्याचा प्रकार वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण माळवे यांनी उघड केला.
उल्हासनगर: कॅम्प नं-२, खेमानी ते रमाबाई आंबेडकर टेकडी दरम्यान बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्याला एका वर्षात तडे गेल्याचा प्रकार वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण माळवे यांनी उघड केला. शहर अभियंता संदीप जाधव यांनी दखल घेत रस्त्याचे ऑडिट व दुरुस्तीचे आदेश दिल्याची माहिती दिली आहे.
उल्हासनगरात गेल्या काही वर्षांपासून बांधण्यात येत असलेल्या रस्त्याला एका वर्षात तडे जात असल्याचे प्रकार घडत आहेत. कॅम्प नं-३ सी ब्लॉक गरुद्वार ते कलानी कॉलेज दरम्यान बांधलेल्या रस्त्याला सहा।महिन्यात तडे गेल्याने, स्थानिक नगरसेवकाने याबाबत तक्रार दिली. तेंव्हा महापालिका बांधकाम विभागाच्या जाग येऊन रस्त्याच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर कॅम्प नं-४ येथील हॉली फॅमिली शाळा समोरील व सार्वजनिक मंडळाकडे जाणाऱ्या रस्त्याला तडे गेले, त्यानंतर मराठा सेक्शन येथील रस्त्याची दुरावस्था झाली. वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण माळवे यांनी खेमानी रस्त्याला एका वर्षात तडे गेल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यावर महापालिकेला जाग आली.
महापालिका शहर अभियंता संदीप जाधव यांनी रस्स्त्याची ऑडिटचे आदेश देऊन रस्त्याचे दोन भाग खराब झाल्याची कबुली दिली. तसेच रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. शहरात बांधण्यात आलेल्या बहुतांश सिमेंट काँक्रीट रस्त्याची हीच अवस्था असून दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होत आहे. महापालिकेने रस्ता बांधल्यानंतर त्याठिकाणी नामफलक लावून रस्त्याची माहिती देऊन रस्त्याची कालमर्यादा व निधीच्या किंमतीचा उल्लेख करावा. अशी मागणी शहरातून होत आहे.