उल्हासनगरच्या महापौर, सेनेचा माफीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:58 AM2018-05-03T01:58:37+5:302018-05-03T01:58:37+5:30

महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमावर महापौर, उपमहापौरांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अघोषित बहिष्कार

Ulhasnagar Mayor, Senna's apology | उल्हासनगरच्या महापौर, सेनेचा माफीनामा

उल्हासनगरच्या महापौर, सेनेचा माफीनामा

Next

उल्हासनगर : महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमावर महापौर, उपमहापौरांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अघोषित बहिष्कार घातल्याच्या ‘लोकमत’च्या वृत्ताचे जोरदार पडसाद बुधवारी महापालिकेच्या महासभेत उमटले. शिवसेनेने केलेल्या मागणीवरून महापौर मीना आयलानी यांनी माफी मागितली, तर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी शिवसेनेच्या वतीने एकही नगरसेवक ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नाही, याबाबत पक्षाच्या वतीने माफी मागितली.
उपमहापौर जीवन इदनानी, भाजपा व ओमी टीमच्या नगरसेवकांनी मूग गिळून बसणे पसंत केले. शहर मनसेही या विषयावर आक्रमक झाली असून त्यांनी अनुपस्थित राहणाºयांवर कारवाई करण्याकरिता थेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले.
महापालिका आयुक्त गणेश पाटील एक महिन्याच्या प्रशिक्षणाला गेल्याने, आयुक्तपदाचा कार्यभार कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त गोंविद बोडके यांच्याकडे दिला आहे. मात्र, त्यांनी शहराकडे ढुंकूनही पाहिलेले नाही, असा आरोप सेना शहरप्रमुख चौधरी यांनी केला. प्रभारी पदभार झेपत नसेल, तर घ्यायचा कशाला, सवाल चौधरी यांनी केला. १ मे रोजी महाराष्ट्र दिन इतरत्र साजरा होत असताना महापालिकेत मात्र शुकशुकाट होता. ध्वजारोहण कार्यक्रमाला महापौर, प्रभारी आयुक्त, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, सभागृहनेते, स्थायी समिती सभापती यांच्यासह अतिरिक्त आयुक्त,
उपायुक्त व नगरसेवकांनी दांडी मारली होती. त्यामुळे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
बुधवारी महासभा सुरू होताच पीआरपीचे प्रमोद टाले, शिवसेनेचे चौधरी, सुरेंद्र सावंत यांनी महाराष्ट्र दिनाचा अपमान करणाºया महापौर, उपमहापौरासह संबंधितांनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. यामुळे महासभेतील वातावरण तापले. महापौर आयलानी यांनी नातीची तब्येत बरी नसल्याने येऊ शकले नाही, असे सांगत उल्हासनगरवासीयांसह संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली. शिवसेनेच्या चौधरी यांनीही अनुपस्थितीबद्दल माफी मागितली.


अधिकाºयांच्या
गैरहजेरीची चौकशी
१महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला बहुतांश अधिकारी गैरहजर राहिले. तसेच बुधवारच्या महासभेलाही बहुतांश अधिकारी गैरहजर राहिल्याने आयुक्तांच्या जागी मुख्य लेखाधिकारी दादा पाटील यांना बसावे लागले.
२महापालिकेच्या इतिहासात प्रथमच प्रभारी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त अनुपस्थित राहिल्याने, महासभेत प्रशासनाची बाजू मांडण्याकरिता मुख्य लेखाधिकारीपदावरील तुलनेने कनिष्ठ अधिकाºयाला बसावे लागले.
३या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली व ती महापौर आयलानी यांनी मान्य केली.मनसेचे
मुख्यमंत्र्यांना साकडे
महाराष्ट्र दिनाचा अपमान करणाºया महापौर, उपमहापौर यांच्यासह महापालिका अधिकारी व नगरसेवकांचा मनसेने निषेध केला. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांसह नगरविकास विभाग, विरोधी पक्षनेते, जिल्हाधिकारी आदींकडे केली.
उपमहापौर व भाजपाचा माफीनामा नाहीच
महापौरासह शिवसेनेने भरमहासभेत अनुपस्थितीबद्दल माफी मागितली. तशीच माफी भाजपा-ओमी टीमसह उपमहापौर इदनानी यांच्याकडून अपेक्षित होती. मात्र, त्यांनी महासभेत मूग गिळून गप्प बसणे पसंत केले.महापालिकेची आमंत्रणपत्रिकाच नाही
महापालिका जनसंपर्क विभागामार्फत १५ आॅगस्ट, २६ जानेवारी, १ मे रोजीच्या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले जाते. मात्र, यावेळी आमंत्रणपत्र मिळालेच नाही, असा दावा शिवसेनेचे नगरसेवक सुरेंद्र सावंत यांनी केला. ७०० कोटींपेक्षा जास्त रकमेचा अर्थसंकल्प असणारी महापालिका आमंत्रणपत्रिका देत नसल्याबद्दल विरोधी पक्षनेते धनजंय बोडारे यांनी खेद व्यक्त केला.

Web Title: Ulhasnagar Mayor, Senna's apology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.