उल्हासनगर सर्वाधिक अस्वच्छ शहर- उपमुख्यमंत्री अजित पवार
By सदानंद नाईक | Published: January 7, 2024 07:58 PM2024-01-07T19:58:06+5:302024-01-07T19:58:15+5:30
"शहर विकासासाठी विशेष निधी, हाच दादाचा वादा".
उल्हासनगर : २५ कोटीच्या विकास निधीतील १७ पैकी ९ विकास कामाचे लोकार्पण करण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहर अस्वच्छ असल्याची टिपण्णी केली. शहर स्वच्छता बाबत शहराचे तिन्ही आमदार व महापालिका आयुक्त यांच्या सोबत चर्चा करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच येत्या आठवड्यात बैठक घेऊन विशेष निधी देणार असल्याचे आश्वासन पवार यांनी देऊन हा दादाचा वादा असल्याचे ते म्हणाले.
उल्हासनगर पूर्वेतील विकास कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचे तत्कालीन महापालिका सभागृहनेते भारत गंगोत्री यांना २५ ,कोटीचा निधी दिला होता. त्यानिधीतून एकून १९ विकास कामे सुरू असून त्यापैकी एकून ९ विकास कामाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे, आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर, गणपत गायकवाड, नेते प्रमोद हिंदुराव आदींच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातून येतांना शहर सर्वाधिक अस्वच्छ दिसल्याचे सांगितले. याबाबत महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी आढावा घ्यावा. असा सूचना केल्या. शहर विकासासाठी येत्या आठवड्यात शहरातील तिन्ही आमदार व महापालिका आयुक्त यांना बोलावून चर्चेनंतर विशेष निधी देण्याचे आश्वासन दिले. हे आश्वासन नसून दादाचा वादा आहे. असे म्हणण्यास ते विसरले नाही. पक्षाच्या सोनिया धामी यांनी शहरातील विविध समस्याचा पाडा यावेळी वाचून दाखविला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेताजी चौकात आगमन होताच ६ जेसीबीच्या साहाय्याने पुलाची उधळण झाली. त्यानंतर अजित पवार यांनी नेताजी गार्डन विकास कामांची पाहणी केली. त्यानंतर ५० लाखाच्या निधीतून उभारण्यात आले पुष्प गार्डनचे लोकार्पण झाले. यावेळी अजित पवार यांनी छोटेखाणी भाषण करून शहराच्या विकासासाठी विशेष निधी व इमारतीचे प्रश्न सोडविणार आश्वासन दिले. तसेच शहर स्वच्छतेवर प्रश्नचिन्हे उभे केले.
गंगोत्रीच्या कामाचे कौतुक
माजी आमदार पप्पु कलानी यांच्या साम्राज्याला आवाहन देणाऱ्या भारत गंगोत्री यांच्यां कामाचे कौतुक उपमुख्यमंत्री अजीज पवार यांनी तोंडभरून केले. मात्र शहराध्यक्ष पदाची घोषणा न केल्याने, शहराचा अध्यक्ष कोण? या चर्चेला उधाण आले आहे.
भाजप नेत्यांचा भरणा
शहर विकास कामाचे लोकार्पण सोहळ्यात राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या पेक्षा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भरणा जास्त दिसत होता.