उल्हासनगर महापालिका आयुक्तांची बैठक; पावसाळ्यापूर्वीच्या कामाचा घेतला आढावा
By सदानंद नाईक | Published: June 19, 2024 06:48 PM2024-06-19T18:48:32+5:302024-06-19T18:48:52+5:30
उल्हासनगर - महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी बुधवारी सभागृहात अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन पावसाळ्यापूर्वीच्या विकास कामाचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना ...
उल्हासनगर - महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी बुधवारी सभागृहात अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन पावसाळ्यापूर्वीच्या विकास कामाचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. आयुक्तांनी घेतलेल्या आढावा बैठकीला महापालिकेच्या विभाग प्रमुखासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
उल्हासनगरात विविध विकास कामे सुरू असून त्या विकामाचा पावसाळ्यापूर्वी आढावा घेण्यासाठी आयुक्त अजीज शेख यांनी बुधवारी आढावा बैठक घेतली. बैठकीला विभागप्रमुखासह अन्य अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वी सुरू असलेले विकासकामे विहित वेळेत पूर्ण करणेबाबत यावेळी आयुक्तांनी निर्देश दिले. शहरातील धोकादायक इमारतीची पाहणी करून, ज्या इमारती धोकादायक व अतिधोकादायक स्थितीत आहेत. त्या इमारतीचे सर्वेक्षण करणे, त्यांना नोटीस देणे, सदर इमारतीचे ऑडिट करून घेणे, अतिधोकादायक असल्यास निष्कासीत करण्याचे निर्देश दिले. तसेच कामगार हजेरी शेडची पाहणी करून कामावर हजर व गैरहजर यांची पाहणी करून दिर्घकालीन गैहरजर असल्यास त्या कामगारांवर कारवाई करण्याचे सुचविले आहे. सफाई कामगाराकडे जंतूनाशक पावडर व इतर सफाई साहित्य पुरेसे आहे का? याची खातरजमा करणे. सर्व छोटे व मोठे नाल्यांची पाहणी करून त्यांचा अद्ययावत अहवाल सादर करणे, लहान-मोठ्या नाल्यांची सफाई त्वरीत करून घेणे. आदींच्या सूचनाही आयुक्तांनी बैठकीत केल्या आहेत.
शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करून, जलवाहिन्यांतील गळती त्वरीत थांबविणेवावत कार्यवाही करणे, एमएमआरडीए मार्फत बनविण्यात येणाऱ्या ७ रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करणे, रस्त्यांवरोल खड़े जीएसपीने बुजविणे व पाऊस थांवल्यावर त्यांचे डांबरीकरण करणे, रस्त्यावरील विद्युत खांबाची पाहणी करून सुस्थितीत करणे, विद्युत वाहिन्यांवरील अडसर येणा-या सर्व झाडांच्या फांद्यांची छटाई करणे, भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने, त्यांचे निर्बिजीकरण करण्याची कार्यवाही जलद करणे आदी कामाचे निर्देश बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्त अजीज शेख यांनी दिले आहे.