उल्हासनगर महापालिकेत ५२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती, तर बारवी धरणग्रस्तासह ७३ जणांना नोकऱ्या

By सदानंद नाईक | Published: January 28, 2023 04:43 PM2023-01-28T16:43:55+5:302023-01-28T16:44:27+5:30

महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशानुसार एकून ५२ सफाई कामगार व सुरक्षा रक्षकांना लिपिक पदी पदोन्नती देण्यात आली.

ulhasnagar municipal corporation 52 employees have been promoted while 73 people including barvi dam victims have received jobs | उल्हासनगर महापालिकेत ५२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती, तर बारवी धरणग्रस्तासह ७३ जणांना नोकऱ्या

उल्हासनगर महापालिकेत ५२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती, तर बारवी धरणग्रस्तासह ७३ जणांना नोकऱ्या

googlenewsNext

सदानंद नाईक,उल्हासनगर: महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशानुसार एकून ५२ सफाई कामगार व सुरक्षा रक्षकांना लिपिक पदी पदोन्नती देण्यात आली. तर वारसाहक्क, अनुकंपातत्व व बारवी धारणग्रस्त तत्वावर एकून ७३ जणांना महापालिका सेवेत सामावून घेण्यात आले. अशी माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. 

उल्हासनगर महापालिकेत वर्ग-१ व २ संवर्गातील ७० टक्के तर वर्ग-३ व ४ संवर्गातील ४० टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त असल्याने, महापालिका कारभार चालविण्यासाठी खाजगी ठेकेदाराकडून विविध पदाकरिता कंत्राटी कामगार घेतले आहेत. याप्रकारने भविष्यात महापालिकेचा कारभार कंत्राटी कामगारांकडे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

१ हजार पेक्षा जास्त पदे रिक्त असल्याने, वारसाहक्क, अनुकंपतत्वावर व बारावी धरणग्रस्तांना महापालिका सेवेत घेण्याची मागणी कामगार संघटनेकडून वारंवार झाली. तसेच प्रभारी पदे कमी करण्यासाठी शैक्षणिक अहर्ता पूर्ण करणाऱ्या सफाई कामगार व सुरक्षा रक्षक आदीं कामगारांना पदोन्नती देण्याच्या मागणीने जोर पकडला होता. अखेर सफाई कामगार व सुरक्षारक्षक मधील कामगारांनी शैक्षणिक अहर्ता प्राप्त करणाऱ्या ५२ कर्मचाऱ्यांची लिपिक व मुकादम पदी पदोन्नती देण्यात आली. 

महापालिकेत वारसाहक्क, अनुकंपतत्वावरील कामे प्रलंबित होते. जानेवारी महिन्यात त्याचा निपटारा करून वारसा हक्काने-३०, अनुकंपतत्वावर-१७ तर बारावी धरणग्रस्त-२६ असे एकूण ७३ कर्मचारी महापालिका सेवेत घेण्यात आल्याची माहिती मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. कामगार संघटनेची पदोन्नती व अनुकंपतत्व, वारसाहक्क, बारावी धरणग्रस्त नागरिकांना पालिका सेवेत घेण्याची मागणी पूर्ण झाली. आयुक्त अजीज शेख यांनी याबाबतचा उल्लेख प्रजासत्ताक भाषणात केले. आयुक्त शेख यांच्या कामाच्या धडाक्याचे कामगार संघटनेच्या नेत्यांनी कौतुक केले. आयुक्त शेख यांनी शहरातील विकास कामे, विविध विभागातील कामाचा आढावा प्रजासत्ताक दिनी घेतल्याने, राजकीय पक्ष नेत्यांनीही त्यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.

Web Title: ulhasnagar municipal corporation 52 employees have been promoted while 73 people including barvi dam victims have received jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.