उल्हासनगर महापालिकेची कार गॅलेरिय दुकानावर कारवाई
By सदानंद नाईक | Published: June 7, 2023 07:23 PM2023-06-07T19:23:52+5:302023-06-07T19:24:17+5:30
उल्हासनगरच्या मधोमध जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अश्या स्थितीत गाड्या पार्किंग केल्या जातात.
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका अतिक्रमण विभागाने बुधवारी रस्त्याच्या पदपथावर अतिक्रमण करणाऱ्या कार गॅलरी दुकानावर कारवाई केली. यापूर्वी रस्त्याच्या वाहतुकीला अडथळा होईल अश्या गाड्यावर महापालिकेने कारवाई करूनही रस्त्यावर गाड्या पार्किंग केल्या जात आहेत.
उल्हासनगरच्या मधोमध जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अश्या स्थितीत गाड्या पार्किंग केल्या जातात. महापालिका अश्या गाड्यावर दंडात्मक कारवाई करूनही येरे माझ्या मागल्या प्रमाणे, गाड्या रस्त्याच्या बाजूला अवैधपणे पार्किंग केल्या जातात. व्यापाऱ्यांचा सवयीमुळे नागरिकांना असुविधा आणि त्रास होतो. याच अशा रस्त्यावर शेकडो वाहने विक्रीसाठी ठेवतात. गाड्या विकण्याचा मोठा व्यवसाय शहरात होतो. याच महामार्गावरील कार गॅलेरीया या दुकानाचे मालक बजाज यांना वारंवार नोटिसा देऊन व दंडात्मक कारवाई करून देखील आपल्या कार्स गटारावर ओटे बांधून जुन्या चार चाकी वाहनांची विक्री करीत आहेत. दुकानाबाहेर दहा फूट रस्ता अडवत असल्यामुळे नागरिकांना इजा करण्यास अडथळा निर्माण होत आहे.
महापालिकेकडे येणाऱ्या रस्त्यावरच हे अतिक्रमण असल्यामुळे वारंवार याबाबत तक्रारी प्राप्त होत्या. कारवाई करण्यास गेले असता, आपल्या राजकीय लागेबांध्यामुळे प्रभागातील कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून कारवाईत अडथळा निर्माण केला जात होता. अखेर बुधवारी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या आदेशाने कार गॅलेरीया यांनी केलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान नागरिकांचा जमाव जमवून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न दुकानदार याने केल्यावर, कायद्याच्या हातोडा उचलून दुकानदाराला समज देण्यात आल्याचे लेंगरेकर यांनी सांगितले. याच प्रमाणे नागरिकांना चालण्यासाठी व रस्त्यावरील इतर वाहनांना येजा करण्यासाठी अडथळा निर्माण होणाऱ्या दुकानदारांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत यावेळी देण्यात आले.