उल्हासनगर महापालिकेचे कंत्राटी सुरक्षा रक्षक अपडेट?; ३ वर्षात एकाचाही दांडी नाही

By सदानंद नाईक | Published: August 11, 2023 07:34 PM2023-08-11T19:34:14+5:302023-08-11T19:34:29+5:30

महापालिका आयुक्तांचे याबाबत चॉकशीचे आदेश

Ulhasnagar Municipal Corporation Contract Security Guard Update?; In 3 years, not a single one has a stalk | उल्हासनगर महापालिकेचे कंत्राटी सुरक्षा रक्षक अपडेट?; ३ वर्षात एकाचाही दांडी नाही

उल्हासनगर महापालिकेचे कंत्राटी सुरक्षा रक्षक अपडेट?; ३ वर्षात एकाचाही दांडी नाही

googlenewsNext

उल्हासनगर : महापालिकेच्या सुरक्षेसाठी खाजगी कंपनीकडून नेमलेले सुरक्षारक्षक एवढे अपडेट आहेत की, गेल्या ३ वर्षात एकानेही दांडी अथवा गैरहजर राहिला नसल्याचे हजेरीपटवरून उघड झाले. याच कारभाराचा पर्दापाश करण्यासाठी आयुक्त अजीज शेख यांनी तक्रार येताच चौकशीचे आदेश देऊन खळबळ उडून दिली आहे.

 उल्हासनगर महापालिकेच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक महामंडळाकडून एकून ८३ सुरक्षा रक्षक नेमले गेले आहेत. मात्र गेल्या ३ वर्षात एकाही सुरक्षा रक्षकांने दांडी मारली नाही. किंवा गैरहजर राहिला नाही. असे त्यांच्या हजेरीपटवरून उघड झाले. गेल्या ३ वर्षात काही जणांचे लग्न झाले. मग या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या लग्नासाठी सुट्टी घेतली नाही का? किंवा त्यांच्या घरच्या मंडळींची एकदाही तब्येत बिघडली नसेल का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. सुरक्षा रक्षक गैरहजर राहिलेतर, त्यांचे पूर्ण वेतन काढले जाते. व गैरहजेरीचे वेतन संबंधित सुरक्षा रक्षकाकडून मागून घेतले जाते का?. असे प्रश्न पडून, अशाप्रकारे फसवणूक व वेतनाचा अपहार होत आहे. आदींची चर्चा महापालिकेत रंगली आहे.

महापालिकेत तैनात असलेल्या एक सुरक्षा रक्षक, स्वतःच्या लग्नानिमित्त २० दिवस रजेवर गेला होता. तरी त्याचे पूर्ण वेतन काढून, नंतर ते मागच्यादाराने परत घेण्यात आले. असे बोलले जाते. काही कर्मचारी आजारपणात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतानाही त्यांचे पूर्ण वेतन काढण्यात आल्याचे उघड झाले आहे. यासाठी मुळ रजिस्टर सोबत एक डुप्लिकेट रजिस्टर ठेवण्यात येते. याबाबत एका सतर्क जागृत नागरिकाने माहिती मागितलल्यावर या सर्वप्रकाराचे बिंग फुटले आहे. आयुक्त अजीज शेख यांच्याकडे तक्रार गेल्यावर, त्यांनी महापालिका मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे यांना ७ दिवसात याची चौकशी करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहे. 

गैरहजर वेळी बदली काम
महापालिकेत विविध ठिकाणी तैनात असलेले सुरक्षा रक्षक हे सोबतीला असणारा सुरक्षा रक्षक काही कामानिमित्त गैहजर राहिल्यास, त्याच्या बदलीत सेवा देतात. असे सर्रासपणे सहमतीने सुरू आहे. त्यामुळे हजेरीपटावर सुरक्षा रक्षक गैहजर दिसत नाही. तसेच त्यांचे पूर्ण वेतन काढले जाते. त्यामुळे गेल्या तीन वर्षात एकाही सुरक्षारक्षक गैहजर दिसला नसावा. अशी माहिती एका सुरक्षा रक्षकाने नाव छापण्याच्या अटीवर दिली आहे.

Web Title: Ulhasnagar Municipal Corporation Contract Security Guard Update?; In 3 years, not a single one has a stalk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.