उल्हासनगर महापालिकेची धडक कारवाई, ६ हजारांपेक्षा जास्त विनामास्क फिरणाऱ्यांना दंडाची पावती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 05:58 PM2021-04-23T17:58:40+5:302021-04-23T17:59:00+5:30
२२ लाखाचा दंड वसूल, उल्हासनगर सारख्या औधोगिक शहरात संचारबंदी व लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर नागरीक विनाकारण फिरणार नाही.
सदानंद नाईक
उल्हासनगर : लॉकडाऊन व संचारबंदी काळात विना मास्क फिरणाऱ्या तब्बल ६ हजारा पेक्षा जास्त नागरीक तसेच दुकानदार व मॅरेज हॉल यांच्यावर महापालिका पथकाने तब्बल २२ लाख २० हजाराचा दंड वसूल केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. विनाकारण फिरणाऱ्यावर वचक बसविण्यासाठी कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
उल्हासनगर सारख्या औधोगिक शहरात संचारबंदी व लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर नागरीक विनाकारण फिरणार नाही. या संकल्पनेला तडा गेला. विनाकारण व मास्क विना फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची जनजागृती महापालिकेच्या वतीने करण्यात आली. त्यानंतरही नागरिक विनामास्क विनाकारण फिरत असल्याने, चौकाचौकात पोलीस व महापालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई सुरू केले. फेब्रुवारी महिन्याच्या २३ ते २८ दरम्यान तब्बल ८९८ विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई केली. तसेच ३३ मॅरेज हॉलवर दंडात्मक कारवाई केली. मार्च महिन्यात ४ हजार १९५ विना मास्क नागरिकांवर कारवाई करून ९ लाख ४६ हजाराची दंडात्मक कारवाई केली. तर एप्रिल महिन्याच्या २१ तारखे पर्यंत १ हजार १२७ जनावर कारवाई केली.
संचारबंदी व लॉकडाऊनच्या दोन महिन्यांच्या कालावधीत महापालिका भरारी पथकाने तब्बल ६ हजार २२२ विना मास्क फिरणारे नागरिक तसेच दुकानदार व मॅरेज हॉल यांच्यावर दंडात्मक करवाई करून तब्बल २२ लाख २२ हजाराचा दंड वसूल केला. महापालिका भरारी पथक व पोलिसांची कारवाई सुरू असतांनाही नागरिक व गाडीचालक बिनधास्त रस्त्यावरून विविध कारणे सांगून फिरत असल्याचे चित्र आहे. श्यावर दंडात्मक नव्हेतर गुन्हे दाखल करण्याची मागणी शहरवासीयकडून होत आहे. विनाकारण व विना मास्क फिरणाऱ्या नागरिक व गाडीचालकावर सक्त करवाई करण्याची मागणी होत आहे.