उल्हासनगर महापालिकेने केला गुणवंत विध्यार्थी व पालकांचा सत्कार
By सदानंद नाईक | Updated: February 28, 2024 20:31 IST2024-02-28T20:30:56+5:302024-02-28T20:31:00+5:30
महापालिका महिला व बालकल्याण विभागा मार्फत मिड टाऊन हॉल मध्ये मंगळवारी दुपारी गुणगौरव सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

उल्हासनगर महापालिकेने केला गुणवंत विध्यार्थी व पालकांचा सत्कार
उल्हासनगर: महापालिका महिला व बालकल्याण विभागा मार्फत मिड टाऊन हॉल मध्ये मंगळवारी दुपारी गुणगौरव सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अत्यंत कठीण परिस्थिती आईनी मुलांना शिकविले अश्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला आहे.
उल्हासनगर महापालिका महिला व बालकल्याण विभागा अंतर्गत स्त्री सक्षमीकरण, बळकटीकरण, सशक्तीकरण, विकास आदी बाबत समाजामध्ये योग्य संदेश पोहचवावा. या हेतुने गुणवंत विध्यार्थांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन महापालिकेच्या मिडटाऊन हॉल मध्ये मंगळवारी दुपारी आयोजित केला होता. कार्यक्रमला उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, विभाग प्रमुख नितेश रंगारी उपस्थित होते. महिला व बालकल्याण विभाग यांनी स्त्री सक्षमीकरण, बळकटीकरण, सशक्तीकरण, विकास इत्यादी बाबींवर समाजामध्ये योग्य संदेश पोहचावा, या हेतुने महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातुन काबड कष्टकरी अत्यंत प्रतिकूल परिस्थीत योग्य पालकत्व निभावून आपल्या मुलांना योग्य शिक्षण दिले. त्यांना आपल्या पायावर उभे केले. शहरातील अश्या महिलांसाठी व परिक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या अत्यंत मेहनती विध्यार्थी व पालकाना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. अशी माहिती जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे यांनी दिली आहे.